नववधूसाठी खास ॲडजस्टेबल पैंजण; ८ नवीन डिझाईन्स-नवरीच्या पायांची वाढवतात शोभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:41 IST2025-12-02T18:34:58+5:302025-12-02T19:41:30+5:30

Adjustable Payal designs : पायात पैंजण घालायला सर्वांनाच आवडते पण पैंजण तुम्ही कोणत्या पॅटर्नचं निवडता हे सु्द्धा महत्वाचे असते.

पायात पैंजण घालायला सर्वांनाच आवडते पण पैंजण तुम्ही कोणत्या पॅटर्नचं निवडता हे सु्द्धा महत्वाचे असते. बाजारात पैंजणांच्या बऱ्याच व्हरायटीज दिसून येतात. (Adjustable Silver Payal For Daily Use)

सध्या एडजस्टेबल पैंजणचा क्रेझ आहे. लग्नसराईसाठी किंवा रोज वापरण्यासाठी तुम्ही असे पैंजण घेऊ शकता. (Adjustable Payal designs)

सोनाराच्या किंवा चांदीच्या व्यापाऱ्यांच्या दुकानात तुम्हाला अशाप्रकारचे पैंजण बनवून मिळतील.

२ हजार रूपयांपासून ते १० हजार रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पैंजण मिळतील.

जर तुम्हाला पैंजणांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे मणी हवे असतील तर तुम्ही सेंटरला किंवा कडेला लावून घेऊ शकता.

जर पैंजणांवर बारीक नक्षीकाम हवे असेल तर त्या थीम चे पैंजणही तुम्ही लग्नसराईसाठी घालू शकता.

या पैंजणांना तुम्ही आवडीनुसार छोटे किंवा मोठे घुंगरू लावू शकता किंवा मोठे लटकनही लावू सकता.

पैंजणांमध्ये सध्या मिनिमलिस्टीक डिझाईन्स बरेच ट्रेंडींग आहेत. इंन्स्टाग्रामवर ट्रेंडींग डिझाईन्स व्हायरल होत असतात. त्याप्रमाणे तुम्ही चांदीचे पैंजण बनवून घेऊ शकता.