केळीचे ८ पदार्थ, चवीला मस्त वजन कमी करतात जबरदस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 17:30 IST2025-03-28T17:21:30+5:302025-03-28T17:30:54+5:30

8 banana dishes - tastes great and help you lose weight : केळ्याचे तयार करा हे मस्त पदार्थ. करायलाही सोपी आणि पौष्टिकही.

केळी आपण नुसतीच खातो. ज्या प्रकारे इतर फळे खातो अगदी तसेच. मात्र केळीचा वापर करून छान पदार्थ ही तयार करता येतात.

जे लोक फीटनेस फ्रिक असतात अशांसाठीही केळीचे हे पदार्थ फार फायदेशीर ठरतात. चवही छान आणि फॅट्सही कमी.

पौष्टिक आहार घेणारे तसेच जीमला जाणारे लोक केळीचे पौष्टिक असे मिल्कशेक पितात. त्यामध्ये साखर घालू शकता. मात्र ते हेल्दी तयार करायचे असेल तर मध वापरा. चवीलाही छान लागते.

एखादा दिवस भाजी न करता आपण शिकरण पोळी खातो. दुधामध्ये केळी कुसकरून घातल्यावर त्यावर मस्त तुपाची धार सोडायची. शिकरण-पोळी चवीलाही छान लागते.

केळीचे पॅनकेक फार मऊ आणि गोडसर असतात. छान पिकलेली केळी वापरा. मैद्याचा वापर करा. पिठीसाखरही वापरा. या मिश्रणातून उत्तम पॅनकेक तयार होतो.

सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा कायम वेगळाच लागतो. त्यामध्ये केळी कुसकरून घातली जातात. शिऱ्याची चव केळ्यामुळे आणखी मस्त लागते.

केक हा प्रकार जरी प्रचंड अनहेल्दी असला तरी तो खजूर, केळ, दूध, मध असे पदार्थ वापरून हेल्दीही करता येतो. बनाना केक हा प्रकार अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.

उन्हाळ्यामध्ये खायलाच हवी केळीची स्मूदी. छान - थंडगार तसेच जीभेवरून सहज पोटात ढकलता येईल असा हा पदार्थ आहे. त्याचे टेक्श्चर अगदी सॉफ्ट असते.

दही आणि केळी वापरून रायता तयार केला जातो. यामध्ये लाल तिखट घातले जाते. जसा पेरू रायता असतो तसाच हा केळी रायता.

कच्च्या केळ्याचे कापही छान होतात. चवीला अगदीच मस्त चमचमीत असतात. तयार करायलाही सोपे आहेत.