रोजच वापरता हे ७ पदार्थ, मात्र त्यांचे गुणधर्मच माहिती नाहीत, पाहा ते कोणते पदार्थ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 20:13 IST2025-03-04T18:47:23+5:302025-03-04T20:13:51+5:30
7 Foods We Use Daily Without Knowing Their Benefits : रोजच्या वापराचे पदार्थ पण का वापरतो माहिती आहे का ? नाही मग जाणून घ्या.

आपला भारतीय आहार हा विविधतेने परिपूर्ण आहेच. तसेच शरीरासाठी उपयुक्त अशा विविध गुणधर्मांचे पदार्थ आपल्या आहारात आहेत.
असे पदार्थ आपण रोजच वापरतो. पण त्यांचा शरीरासाठी असणारा उपयोग आपल्याला माहितीच नसतो.
असे सात पदार्थ आहेत, ज्यांच्या वापराशिवाय आपला दिवसच जात नाही. तरीही त्यांचे गुणधर्म आपल्याला माहिती नाहीत.
१. जिरं
रोजच्या फोडणीला आपण जिरं वापरतो. भाजीला नाही तर आमटीला. जिऱ्यामुळे पचन चांगले होते. पोटात गॅस होत नाहीत.
२. हिंग
आपण जेवणात हिंग वापरतो. आपल्या आहारातील अनेक पदार्थ उष्ण असतात. त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून फोडणीला हिंगाचा वापर केला जातो.
३. लसूण
लसूण खरी फार औषधी आहे. कलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसूण खातात. तसेच अनेक फायदे आहेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
४. मोहरी
फोडणीला आपण मोहरी वापरतो. त्यामध्ये संगर्ग प्रतिकारक सत्व असतात. त्यामळे मोहरी शरीरासाठी आवश्यक असते. रक्तदाबावरही नियंत्रण राहते.
५. कणीक
पोळ्या असो वा पुऱ्या ते तयार करण्यासाठी कणीक लागते. कणीक म्हणजे गव्हाचे पीठ त्यामुळे ती पचन संस्थेसाठी फार उपयुक्त असते. जवळपास रोजच आपण कणकेचा वापर करतो.
६. चहा पावडर
चहा जरी शरीरासाठी हानिकारक असला तरी चहा पावडर केसांसाठी तसेच त्वचेसाठी चांगली असते. त्यामुळे नुसत्या चहा पावडरचा चहा पिणे शरीरासाठी गुणकारी ठरेल.
७. लिंबू
रोज पाटात लिंबाचा रस जाणे शरीरासाठी प्रचंड चांगले आहे. कारण लिंबामध्ये अनेक सत्व असतात. लिंबू जीवनसत्त्वांनी भरलेले असते.