रोज ५ त्रास असतील तर स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होतात, पाहा यादी-म्हातारपण तुम्हालाही गाठतंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:52 IST2026-04-13T17:11:12+5:302026-04-13T17:52:44+5:30
5 Types Of Women Who Gets Old Very Fast : शारिरीक हालचाल कमी असल्यास शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. ज्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो.

महिला लवकर म्हाताऱ्या दिसण्यामागे प्रामुख्यानं जीवनशैली आणि मानसिक ताण-तणाव ही कारणं असतात. (These 5 Types Of Women Who Gets Old Very Fast)

1) सतत स्ट्रेस
ज्या महिला सतत कौटुंबिक किंवा कामात चिंतेत असतात. त्यांच्या शरीरात कोर्टिसोल हॉर्मोन वाढते. ज्यामुले चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडतात.

2) झोप पुरेशी न घेणं
रोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप न घेणाऱ्या महिलांच्या त्वचेची दुरूस्ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे चेहरा निस्तेज वाटतो.

3) पालेभाज्या न खाणं
आहारात पालेभाज्या आणि फळांचा अभाव असल्यास किवा जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यास किंवा तेलकट पदार्थ खाणाऱ्या महिलांमध्ये वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसतात.

4) पाणी कमी पिणं
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते आणि तिची लवचीकता कमी होते परिणामी लवकर वृद्धत्व येते.

5) शारीरिक हालचाल कमी
शारिरीक हालचाल कमी असल्यास शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. ज्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो.

प्रखर उन्हात जास्त वेळ काम करणाऱ्या आणि सनस्क्रीनचा वापर न करणाऱ्या महिलांच्या त्वचेचे नुकसान होऊन त्या लवकर वयस्कर दिसू लागतात.

















