शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे ५ शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 09:20 IST

1 / 6
बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. पण योग्य आहार घेतला तर ही कमतरता नक्कीच भरून काढता येऊ शकते, असंही काही अभ्यासातून समोर आलं आहे.
2 / 6
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार MediBuddy यांनी जो अभ्यास केला त्यानुसार असे काही पदार्थ आहेत जे शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात.
3 / 6
त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे फोर्टीफाईड फूड. या प्रकारच्या पदार्थांमध्ये असे अनेक पौष्टिक घटक असतात जे सहजासहजी आपल्याला इतर आहारातून मिळू शकत नाही. त्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाणही चांगले असते. बाजारात फोर्टीफाईड फूडचे कित्येक प्रकार तुम्हाला मिळू शकतात.
4 / 6
शरीरातली व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढायची असेल तर दही, योगर्ट, इडली, डोसा असे प्रोबायोटिक किंवा फर्मेंटेड फूडही खाल्ले पाहिजे. कारण या पदार्थांमध्ये असणारे हेल्दी बॅक्टेरिया व्हिटॅमिन बी १२ ची कमी भरून काढण्यास मदत करतात.
5 / 6
पालक, मेथी यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमधून मिळणारे लोह आणि फोलेट शरीरात व्हिटॅमिन बी १२ अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यास मदत करतात.
6 / 6
तसेच बीट, डाळिंब यासारखे भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेट देणारी फळं देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असणाऱ्या लोकांनी नियमितपणे खायला हवी.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न