शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तळपायाला मालिश करण्याचे ५ जबरदस्त फायदे! कधी- कशी मालिश करायची? बघा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 8:10 AM

1 / 8
१. दिवसभर सगळ्या शरीराचा भार पेलणारे तळपाय रात्रीच्यावेळी खरोखरच थकून गेलेले असतात. सगळ्या शरीराची आपण योग्य काळजी घेतो. पण तळपायांकडे मात्र सोयिस्करपणे दुर्लक्ष करतो.
2 / 8
२. पण सगळ्या शरीराचं आरोग्य जपणं जसं गरजेचं आहे, तशीच काळजी तळपायांचीही घेणं आवश्यक आहे. म्हणूनच तर तळपायांना नियमितपणे का मालिश केली पाहिजे, त्याने नेमके कोणते फायदे होतात, याविषयी बघा आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती.
3 / 8
३. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वारालक्ष्मी सांगतात की आपल्या तळपायावर डोळ्यांच्या आरोग्याशी निगडीत ४ पॉईंट्स असतात. त्यामुळे तळपायांना नियमितपणे मालिश केल्यास नजर वाढण्यास मदत होते. डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात.
4 / 8
४. ज्यांची वात प्रकृती असते, त्यांनी नियमितपणे तळपायांना मालिश करावी. शरीरातील वात कमी होण्यास मदत होते.
5 / 8
५. एखाद्या गोष्टीचा खूप ताण आला असेल, खूप थकल्यासारखे वाटत असेल तर तळपायांना केलेली मालिश फायदेशीर ठरते. ताण कमी होतो तसेच थकवा दूर होण्यास मदत होते.
6 / 8
६. ज्यांना रात्री बराच वेळ झोप लागत नाही किंवा शांत झोप होत नाही, त्यांनीही तळपायांना मालिश करावी आणि नंतर झोपावे. शांत झोप मिळेल.
7 / 8
७. पायाच्या जाॅईंट्सला मजबूती देण्याचे काम मालिशमुळे होते.
8 / 8
८. तळपायांना मालिश करण्यासाठी तिळाचे तेल किंवा ब्राह्मी तेल वापरणे अधिक फायदेशीर ठरते. पायांना मालिश करायची असेल तर दररोज रात्री झोपण्यापुर्वी गरम तेल लावून करावी.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सeye care tipsडोळ्यांची निगा