शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रोजचा स्वयंपाक होईल पटकन -पदार्थ होतील चविष्ट! सोप्या १० किचन टिप्स-वेळ, मेहनत दोन्ही वाचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 20:00 IST

1 / 10
महिलांना रोजच्या धावपळीच्या जीवनात तासनतास स्वयंपाकघरात उभं राहून काम करणं कधीकधी थकवणारं ठरू शकतं. कधी भात करपतो, तर कधी पुऱ्या तेलकट होतात, अशा छोट्या-छोट्या चुकांमुळे आपली मेहनत आणि वेळ दोन्ही वाया जातात.(Smart cooking tips and tricks)
2 / 10
पण जर आपल्याला काही 'स्मार्ट' टिप्स आणि युक्त्या माहिती असतील, तर हेच काम अतिशय सोपं आणि आनंददायी होऊ शकतं. स्वयंपाकाची चव केवळ मसाल्यांवर अवलंबून नसते, तर ती अन्न शिजवण्याच्या योग्य पद्धतीवरही अवलंबून असते. आपल्या रोजच्या स्वयंपाकाला अधिक स्मार्ट आणि चविष्ट बनवण्यासाठी जाणून घेऊया काही खास टिप्स (Kitchen efficiency tips for daily life)
3 / 10
कणीक मळताना त्यात चवीनुसार थोडे मीठ घातल्यास पोळीची चव अधिक छान लागते.
4 / 10
पुऱ्या तळताना तेलात चिमूटभर मीठ घाला. यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषत नाहीत आणि त्या कमी तेलकट होतात.
5 / 10
जर चुकून भात करपला, तर त्यावर पावाचा एक तुकडा ठेवा आणि झाकण लावा. ब्रेड करपलेला वास शोषून घेतो.
6 / 10
ज्वारीची भाकरी थापताना हाताला थोडे पाणी लावा. यामुळे भाकरी पिठाला चिकटत नाही आणि ती एकसारखी थापली जाते.
7 / 10
पोळ्या गरम डब्यात भरताना डब्याच्या तळाला आधी एक सुती नॅपकिन ठेवा. यामुळे पोळ्यांना वाफेचा घाम येत नाही आणि खालची पोळी भिजत नाही.
8 / 10
पराठे मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे दही मिसळा.
9 / 10
भात शिजवताना कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावा. यामुळे शिट्टी होताना पाणी बाहेर उडून ओटा खराब होणार नाही.
10 / 10
बिर्याणीसाठी भात शिजवताना पाण्यात खडे मसाले आणि मीठ आवर्जून टाका. यामुळे भाताला आतपर्यंत छान सुगंध आणि चव येते.
टॅग्स :foodअन्नkitchen tipsकिचन टिप्स