Raksha Bandhan 2019 : बहिणीला गिफ्ट देण्यासाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:43 PM2019-08-12T14:43:47+5:302019-08-12T14:49:43+5:30

भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे बहिणीला खूश करण्यासाठी तुम्ही काय काय भेटवस्तू देऊ शकता ते जाणून घेऊया.

रक्षाबंधनाला बहिणीला काय भेटवस्तू द्यायची हा सगळ्याच भावांना पडणारा मोठा प्रश्न असतो. मात्र वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या बहिणीला एक छान घड्याळ भेट म्हणून देऊ शकता.

मुलींना नटायला खूप आवडतं त्यामुळे बहिणीला मेकअप किट गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय आहे.

फॅशन म्हटलं की, मुली साधारणतः ट्रेन्डनुसार ज्वेलरी वेअर करतात. सध्या सिल्वर ज्वेलरी ट्रेन्डमध्ये आहे. तुमचं बजेट असेल तर तुम्ही ओरिजनल सिल्वर ज्वेलरी खरेदी करू शकता. अन्यथा बाजारात सिल्वरप्रमाणे दिसणाऱ्या अनेक ज्वेलरी उपलब्ध असतात. तुम्हाला अगदी 200 ते 300 रूपयांमध्ये मिळतील.

पर्स ही प्रत्येक मुलीच्या आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एखादी छानशी हँड बॅग रक्षाबंधनासाठी बहिणीला देण्याचा विचार करू शकता.

रक्षाबंधनच्या काही दिवस आधीच फ्रेंडशिप डे येतो. त्यामुळे बाजारात अनेक फॅन्सी आणि ट्रेन्डी ब्रेसलेट उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या बहिणीला एखादं छानसं ब्रेसलेट देऊ शकता.

अनेक ऑनलाईन वेबसाइट आहेत तिथे तुम्हाला अगदी स्वस्तात कस्टमाइज टी-शर्ट मिळतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टी-शर्ट डिझाइन करू शकता.

गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला इअरफोन गिफ्ट करू शकता.

स्वत: जवळ कितीही कपडे असले तरी प्रत्येक मुलीला ते कमीच वाटत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर ड्रेस घेऊ शकता.

रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही एखादी सोन्याची भेटवस्तू देऊ शकता.