Father's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 17:01 IST2019-06-15T16:57:32+5:302019-06-15T17:01:49+5:30

प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी त्यांच्यासाठी कार्ड तयार करतात, गिफ्ट देतात. वडिल प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. आपल्याला घडवणाऱ्या आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या वडिलांना छोटसं थॅक्स म्हणण्यासाठी तुम्ही त्यांना छानसं गिफ्ट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला फादर्स डेसाठी काही खास गिफ्ट देण्यासाठी पर्याय सुचवणार आहोत.
तुमच्या वडिलांना चहा आवडत असेल तर...
जर तुमच्या वडिलांना चहा आवडत असेल आणि त्यांची सकाळ आणि संध्याकाळ चहाशिवाय व्यर्थ असेल तर तुम्ही त्यांना स्पेशल टी ब्लेंड्स आणि टी वरायटी गिफ्ट म्हणून देऊ शकता. सध्या बाजारातही चहाचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. तुम्हा वडिलांची आवड लक्षात घेऊन त्यातील एखादी निवडू शकता.
बिजनेस ट्रिपसाठी परफेक्ट गिफ्ट
जर तुमचे वडिल बिजनेसमन असतील किंवा कामानिमित्ताने त्यांना सतत शहरातून बाहेर जावं लागत असेल तर त्यांच्या पर्सनॅलिटीला मॅच करणारं व्हॉलेट, डॉक्युमेंट होल्डर किंवा ब्रीफकेस गिफ्ट म्हणून देऊ शकता.
जर तुमचे वडिल वाइनचे शौकीन असतील तर...
जर तुमच्या वडिलांना जर वाइन आवडत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी फ्रुट वाइन घेऊ शकता. बाजारात अनेक अशा वाइन्स उपलब्ध आहेत, ज्यांच्यामध्ये अल्कोहोल अजिबात नसतं. तुम्ही अशीच एखादी वाइन वडिलांसाठी निवडू शकता.
जर वडिल काटेकोरपणाने वेळ पाळत असतील तर...
जर तुमचे वडिल पंक्च्युअल असतील आणि त्यांना वेळ पाळणं आवडतं असेल तर तुम्ही त्यांना एखादं छानसं घड्याळ गिफ्ट करू शकता.
पर्सनलाइज्ड कॉफी मग
पर्सनलाइज्ड कॅपप्रमाणे तुम्ही गरज असेल तर आजोबांसाठी एखादा कॉफी मगही देऊ शकता. शक्य असल्यास त्या मगवर त्यांचा एखादा छानसा फोटो आणि त्यावर एक मेसेज लिहू शकता.