Diwali 2019 : भाऊबीजेला बहिणीला द्या युजफूल गिफ्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 13:19 IST2019-10-28T12:52:23+5:302019-10-28T13:19:39+5:30

'भाऊबीज' हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. हटके गिफ्ट्स देऊन भाऊबीज स्पेशल करता येईल.
ज्वेलरी
महिलांना दागिन्यांची खूप हौस असते. त्यामुळे तुम्ही बहिणीला तिला आवडत असलेला छानसा दागिना गिफ्ट करा. ईयरिंग्स, ब्रेसलेट, पेंडेंट, नेकपीस अशा बजेटमधील विविध गोष्टी गिफ्ट करू शकता
कपडे
मुलींना नेहमीच फॅशनेबल आणि ट्रेंडी कपड्याची क्रेझ असते. भाऊबीजच्या निमित्ताने ट्रेडिशनल, वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न कपडे गिफ्ट करा.
घड्याळ
बाजारात विविध आकाराची आणि रंगाची आकर्षक घड्याळं मिळतात. सध्या डिजीटल वॉचची चर्चा रंगली आहे. तुम्ही स्मार्ट वॉच गिफ्ट करू शकता.
हँड बॅग
मुलींना कपड्यांसोबतच फॅशनेबल बॅग देखील प्रचंड आवडतात. त्यामुळे खास सणाच्या निमित्ताने स्टायलिश हँड बॅग गिफ्ट करणं हा उत्तम पर्याय आहे.
ब्यूटी प्रोडक्ट्स
महिलांना नटायला आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला ब्यूटी प्रोडक्ट्स गिफ्ट करून यंदाची दिवाळी आनंदात साजरी करा.
हॉलीडे पॅकेज
बहिणीला फिरण्याची आवड असेल तर तिला एखाद्या सुंदर आणि शांत ठिकाणंच हॉलीडे पॅकेज गिफ्ट करा हे हटके गिफ्ट तिला नक्कीच आवडेल.
हेडफोन, पाकिट, पॉवर बँक, गॉगल, वॉच, पर्सनलाईज्ड फोन कव्हर यासारख्या लागणाऱ्या गोष्टी देखील गिफ्ट करू शकता.