शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 3:21 PM

1 / 12
रत्नागिरीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरं वाहून गेली आहेत.
2 / 12
कोकणातील निसर्गरम्य चिपळूण पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याची ही भयानक दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत.
3 / 12
कोकण म्हटलं की बैठी कौलारू घरं असं समीकरण असतं. पावसात हिरव्यागार डोंगराळ भागात वसलेली ही घरं लक्ष वेधून घेत असतात. पण यावेळी पुराच्या हाहाकारानं चिपळूणमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालीय.
4 / 12
चिपळूण आणि खेडमध्ये अनेक ठिकाणी १२ फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. गेल्या १० तासांपासून पाणी उतरलेलं नाही
5 / 12
अनेक नागरिकांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जवळच्या इमारतींमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. कौलारु घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
6 / 12
इमारतीचे तळमजले पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. पुराच्या १० तासांनंतर अखेर एनडीआरएफची एक टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे.
7 / 12
आसमंतातून कोसळणाऱ्या जलधारा आणि जगबुडी नदीचा पूर त्यात समुद्रातही भरती यामुळे कोकणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय.
8 / 12
पुरामुळे अनेक कोकणवासीयांचे संसार कोलमडून वाहून गेले आहेत.
9 / 12
जवळपास ५ हजार लोकांना पुराच्या पाण्यानं विळखा घातल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी इमारतीच्या अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचलं आहे.
10 / 12
गेल्या १० तासांपासून चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती कायम असून पुराचं पाणी काही कमी होताना दिसत नाहीय
11 / 12
चिपळूणच्या ग्रामीण भागासह शहरी भाग आणि बाजारपेठेतही महाभयंकर परिस्थिती पाहायला मिळते आहे.
12 / 12
पुराच्या पाण्यात बुडालेल्या वाहनांची ही छायाचित्र पाहूनच चिपळूणमधील गंभीर परिस्थितीची आणि नुकसानाची कल्पना येईल.
टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाfloodपूरRainपाऊसRatnagiriरत्नागिरीKhedखेडChiplunचिपळुण