Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३ ते ९ एप्रिल २०२२; नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील; नको असलेली जबाबदारी घ्यावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:59 AM2022-04-03T07:59:21+5:302022-04-03T08:09:33+5:30

Weekly Horoscope 3rd to 9th april 2022: कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

नवीन वर्ष शके १९४४ ची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचे नाव आहे शुभकृत. एप्रिल पण सुरू झाला आहे. या सप्ताहात ७ एप्रिल रोजी मंगळ कुंभ राशीत, तर ८ एप्रिल रोजी बुध मेष राशीत प्रवेश करत आहेत. याशिवाय अन्य कोणतेही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी- राहू, हर्षल मेश राशीत असून, ८ एप्रिलपासून बुध पण तेथे येत आहे. केतू वृश्चिक राशीत आहे. शनी, मंगळ आणि प्लुटो मकर राशीत आहेत. ७ एप्रिलपासून मंगळ मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. तेथे त्याची युती गुरू, शुक्र आणि नेपच्यून यांच्या समवेत होईल. रवी मीन राशीत आहे. त्याची ८ एप्रिलपर्यंत बुधाशी युती राहील. चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील.

मेष- कामाचा ताण राहील. सप्ताहाची सुरुवात थोडी कटकटीची असेल. नोकरीत वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. काहींना स्थान बदलाला सामोरे जावे लागेल. चिंतेचे विचार मनात येतील. हितचिंतक व्यक्तीशी मन मोकळे करा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. मात्र धाडसी निर्णय घेऊ नका. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

वृषभ- अनुकूल घटना घडतील. अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कामात मन लागेल. उत्साह राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काहींना उच्च अधिकार प्राप्त होतील. सरकारी कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. जवळचे प्रवास करावे लागतील. मनासारखी धनप्राप्ती होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात बरकत राहील. हातात पैसा खुळखुळता राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

मिथुन- दगदग करू नका. संमिश्र ग्रहमान राहील. सुरुवातीला खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. दगदग होईल अशी कामे करू नका. आराम करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. आपला नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. चांगली संधी मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे व्यवहार जुळून येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क- संयमाने वागणे आवश्यक. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना भेटवस्तू मिळतील. नोकरीत तणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाने बोलणे आवश्यक आहे. तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. व्यवसायात कटकटी निर्माण होतील. तब्येतीकडे लक्ष द्या. वाहने जपून चालवा. दूरचे प्रवास करावे लागतील. जीवनासाथी आपल्याला सांभाळून घेईल. रागावर नियंत्रण ठेवा. कुणाला दुखावू नका. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

सिंह- कामे मार्गी लागतील. अनुकूल वातावरण राहील. अनेक कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. नोकरीत बदली होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नवीन दिशा गवसेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. आपले अंदाज बरोबर ठरतील. थोरा मोठांच्या सहवासात याल. त्याचा पुढे फायदा होईल. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

कन्या- नवीन जबाबदारी मिळेल. सप्ताहाच्या प्रारंभी थोडी दगदग होईल. तणाव राहील. थोडा संयम ठेवलेला बरा. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरतील. नोकरीत बदली होऊ शकते. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर काम होईल. आर्थिक आवक चांगली राहील. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदार चांगली साथ देईल. जोडीदाराच्या भावनांची कदर करा. काही कामे वेळेच्या आधीच पूर्ण करून ठेवा. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ- तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. काहींना नको असलेली जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. त्यात तुमचा कस पाहिला जाईल. थोडे तणावाचे व्यवस्थापन नीट केले पाहिजे. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने अनुकूल हालचाली सुरू होतील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. दगदग होईल अशी कामे करू नका. मुलाच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. आठवड्याच्या शेवटी पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृश्चिक- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अनेकांची मदत मिळेल. मात्र कायद्याची बंधने पाळण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. नोकरीत थोडा तणाव राहील. एखाद्या प्रकरणात कटकटी निर्माण होतील. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपण भले आणि आपले कामे भले असे धोरण ठेवा. जोडीदाराच्या सल्ल्याने वागणे इष्ट ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. हितशत्रूपासून सावध राहा. वाहने जपून चालवा. प्रवास शक्यतो टाळा. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

धनू- प्रगती होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. घरातील कामे आणि नोकरी व्यवसाय यांचा ताळमेळ साधताना धावपळ होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. एखादी चांगली जबाबदारी मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. व्यवसायात बरकत राहील. मोठे सौदे फायद्याचे ठरतील. घरात तुमच्या मर्जीनुसार निर्णय घेतले जातील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मकर- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे घटना घडतील. घरात किरकोळ कारणावरून वाद वाढून तणावाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे सबुरीने वागण्याची गरज आहे. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका. तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जीवनसाथीच्या कलाने घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.

कुंभ- ताण कमी होईल. सतत कार्यरत राहाल. कामाचा ताण राहील. मात्र योग्य नियोजनामुळे कामे पूर्ण होतील. सप्ताहाच्या शेवटी मनातील काळजी, ताण कमी होईल. मनात आनंदी व सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीची चांगली मदत मिळेल. प्रसिद्धी, मान मिळेल. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

मीन- मुलांना यश मिळेल. ग्रहांचे भ्रमण अनुकूल राहील. कायदेविषयक कामे होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक अंदाज चुकू शकतात. मोठी गुंतवणूक करणे टाळा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. अन्यथा पैसे अडकून पडतील. तसेच कागदपत्रे वाचून सही करा. आर्थिक बाबतीत जीवनसाथीचा सल्ला घ्या. नोकरीत बदल होईल. मुलांना यश मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.