शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दारूच्या बाटल्या, साड्या अन्...; स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर समोर आली बंद शिवशाही बसेसमधील भयंकर दृश्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:26 IST

1 / 7
पुण्यातील नेहमी गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. निर्जनस्थळी उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये ही घटना घडली.
2 / 7
या घटनेमुळे बस स्थानक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली. त्यावेळी बंद अवस्थेत असलेल्या बसची पाहणी केली. त्यातील दृश्ये धक्कादायक होती.
3 / 7
या बसेसमध्ये वापरलेल्या कंडोम्सची पाकिटे, साड्या, चादरी आणि दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. या बसेस भंगारात निघालेल्या आहेत, त्यांची चाकेही काढून घेण्यात आली आहेत. निर्जन स्थळी असल्याने त्या बसेसमध्ये दररोज बलात्कार होत असणार, असे वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
4 / 7
या बंद पडलेल्या शिवशाही बसेसमध्ये काही आसनावर साड्या पडलेल्या आहेत. मागच्या आसनावरही साड्या आहेत. तर चादरी सामान ठेवण्याच्या ठिकाणी आहेत.
5 / 7
दारूच्या बाटल्याही या बसेसमध्ये आढळून आल्या. स्वारगेट बस स्थानकात बंद पडलेल्या अशा चार शिवशाही बसेस आहेत. तिथे असे गुन्हे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होताहेत, असेही मोरेंनी म्हटले आहे.
6 / 7
शिवशाही बसेसच्या नावाखाली या आरोपींनी लॉजिंग तयार केले आहे. इथे चादरी, साड्या पडल्या आहेत. २० सुरक्षा जवान इथे आहेत, ते काय करतात? असा सवाल मोरेंनी केला आहे.
7 / 7
इथे दररोज बलात्कार होताहेत आणि तेही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून या गोष्टी होत आहेत, असेही मोरे म्हणाले.
टॅग्स :Swargateस्वारगेटCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसShivshahiशिवशाही