खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 23:49 IST2017-09-07T23:45:28+5:302017-09-07T23:49:53+5:30

पुण्यात खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली.

मालगाडीचे डबे रुळावरून खाली उतरल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

खंडाळा येथे गेट क्रमांक 19 जवळची घटना घडली आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या दिशेनं जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द केली आहे. सीएसएमटी- डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे-इंद्रायणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत

खंडाळा येथे मालगाडी घसरल्याने मिरज-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिरजेकडून मुंबईला जाणाऱ्या चालुक्य एक्सप्रेस व हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन्ही एक्स्प्रेस, महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.