तोरणा किल्ला आहे खास, ट्रेकिंग करा बिनधास्त !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:44 IST2019-02-05T16:31:07+5:302019-02-05T16:44:04+5:30

पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा तोरणा गड प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा.
या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडले होते.
त्या धनाचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी करण्यात आला.
तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात आहे.
पुण्यापासून वेल्ह्याला जाण्यासाठी बसेसची सोय आहे.
तोरणा या किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यास तरुणाईची पसंती असते.