अष्टविनायकातही निनादला आर‘ती’चा तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 23:09 IST2017-08-28T22:59:37+5:302017-08-28T23:09:49+5:30

महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायकांमध्येही महिलाशक्तीचा जयघोष झाला.

गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून अष्टविनायकातील मोरगावचा मयूरेश्वर, थेऊरचा चिंतामणी मंदिरात महिलांनी आरती केली. 

तसेच, रांजणगावचा महागणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, पालीचा बल्लाळेश्वर आणि महडच्या वरदविनायक मंदिरात महिलांच्या हस्ते आरती झाली.