शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pune : कडक निर्बंधातही चंद्रकांत पाटलांकडून रॅम्बो सर्कसचं उद्घाटन, जोकरचा केला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 11:00 PM

1 / 7
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात रॅम्बो सर्कसचे उद्घाटन केले. रँबो सर्कसचे उद्घाटन करून या कलेचा आस्वाद घेतला, असे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले.
2 / 7
निराशेच्या गर्तेत अडकलेल्या प्रेक्षकांना त्यांच्या अडचणी विसरायला लावून हसायला लावणे ही जबाबदारी विदूषक आणि सर्कसमधील इतर कलाकार उत्तमरीत्या पार पाडतात.
3 / 7
सर्कसचे महत्त्व ओळखून लॉकडाऊनच्या काळात विविध सोसायटीतील नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माझ्या पुढाकारातून ऑनलाईन सर्कसचा प्रयोग राबविण्यात आला.
4 / 7
या संकटकाळात भाजपा उद्योग आघाडीच्या माध्यमातून सर्व कलाकारांना मदतीचा हात देण्यात आला. सर्कस ही कला आणि त्यातील कलाकार जगले पाहिजेत यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासन याप्रसंगी पाटील यांनी उपस्थित कलाकारांना दिले आहे.
5 / 7
दरम्यान, यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, भाजप चे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, नगरसेवक हरिदास चरवड, सागर भूमकर,आनंद दांगट, अभिजीत धावड़े,मंगेश खराडे,वैभव मुरकुटे, सर्कस चे व्यवस्थापक राजू आयसॅक इ मान्यवर उपस्थित होते.
6 / 7
चंद्रकांत पाटील हे रसिक आहेत, त्यामुळेच त्यांनी सर्कसच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी, सर्कसीतील कलाकारांचा सन्मानही केला.
7 / 7
सर्कसीतील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणजे विदूषक होय. पाटील यांनी या विदूषक मंडळींच्या कलेचा सन्मान केला, त्यांचे कौतुकही केले
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेBJPभाजपा