By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:53 IST
1 / 8भारतीय रेल्वेचे ‘रेल मदत ॲप’ फायद्याचे रेल्वे प्रवाशांच्या सर्व तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल मदत’ हे ॲप सुरू केले. हे ॲप मोबाइल आणि वेब पोर्टल अशा दोन्ही स्वरूपात असून, प्रवाशांना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी थेट रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवता येते. पुणे विभागात गेल्या जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात दोन हजारांहून अधिक काॅल आले आहेत.2 / 8समस्यांचे तत्काळ निरसन : या सुविधेमुळे प्रवाशांना आता तक्रार करण्यासाठी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाची किंवा लेखी अर्जाची वाट पाहावी लागणार नाही. ॲपवर तक्रार नोंदवताच ती संबंधित विभागाकडे तत्काळ वर्ग केली जाते. रेल्वे प्रशासन त्यावर युद्धपातळीवर कारवाई करते. कमी वेळेत अडचणी सोडवणूक होणार आहे.3 / 8ॲपवर मिळतात या सुविधा : वैद्यकीय मदत : प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास या सुविधेद्वारे तातडीची वैद्यकीय मदत मागवता येते.4 / 8चोरी, सुरक्षितता : चोरी झाल्यास किंवा असुरक्षित वाटल्यास आरपीएफकडून तत्काळ संरक्षण मिळविण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे.5 / 8रेल्वेतील अस्वच्छता : डबा किंवा शौचालय अस्वच्छ असल्यास तक्रार करता येते.6 / 8५ ते १० मिनिटांत कॉलबॅक ‘रेल मदत ॲप’वर प्रवाशाने तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्रवाशाला संपर्क साधला जातो. 7 / 8या कॉलबॅकमुळे तक्रारीची दखल घेतली गेल्याची खात्री प्रवाशांना मिळते आणि त्यांचे समाधान केले जाते. 8 / 8रेल्वे प्रवासात प्रवाशांना अनेकदा अस्वच्छता, जेवणाचा निकृष्ट दर्जा किंवा अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्याचे तातडीने निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल मदत’ हे अद्ययावत ॲप तीन वर्षांपूर्वी सुरू केले