शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निरोप देतो देवा आता आज्ञा असावी! पुण्यातील मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 11:33 PM

1 / 13
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला महापौर हार घालतात व त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते..(सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे)
2 / 13
कसबा गणपतीचा नयनरम्य आरती सोहळा
3 / 13
मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन - ११ वाजून ४५ मिनिटांनी
4 / 13
मानाचा दुसरा गणपती असा नावलौकिक असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या श्रींची मनमोहक मूर्ती
5 / 13
तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा - १२ वाजून ४५ मिनिटांनी विसर्जन
6 / 13
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम- फुलांच्या माळांची आकर्षक सजावट असलेल्या कुंडात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गुरुजी तालीम मंडळाच्या 'श्रीं' चे - १ वाजता विसर्जन
7 / 13
मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती
8 / 13
चौथ्या मानाच्या गणपती विसर्जनाअगोदर नयनरम्य पालखी सोहळा रंगला.त्यानंतर मूर्तीचे विसर्जन - १ वाजून १० मिनिटे
9 / 13
केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाजप आमदार मुक्ता टिळक, दीपक टिळक रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.
10 / 13
दीपक टिळकांच्या हस्ते श्रींची आरती
11 / 13
मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात केसरीवाडा गणपतीचे विसर्जन-१ वाजून ३० मिनिटे
12 / 13
भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव हा अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख मंडळाकडून सांगितली जाते
13 / 13
भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन सोहळा..१ वाजून ३० मिनिटांनी विसर्जन
टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका