शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या तुलनेत किती पैसे?; अजित पवारांचा मेट्रोने प्रवास, प्रवाशांसोबत संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:26 IST

1 / 11
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. त्यांच्या कामाची आणि सकाळी-सकाळी कामाला सुरुवात करण्याची अनेकदा चर्चा होत असते.
2 / 11
आज पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी सकाळीच मेट्रोने प्रवास करत इच्छित स्थळ गाठले. यावेळी, मेट्रोमधील प्रवाशांसोबत दिलखुलासपणे संवाद साधला.
3 / 11
विशेष म्हणजे, प्रवाशाना मेट्रोचे तिकीट, रिक्षाचे भाडे यांच्यातील फरकही उपमुख्यमंत्र्यांनी विचारला. त्यावेळी, प्रवाशांनीही मेट्रोमुळे प्रवास सहज-सोयीचा झाल्याचे म्हटले.
4 / 11
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या मेट्रोतून प्रवास केला असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सोबत होते. यावेळी त्यांनी उभ्यानेच प्रवास करत पुणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
5 / 11
अजित पवार यांच्यासमवेत मेट्रोचेही अधिकारी उपस्थित होते, ते त्यांना माहिती देत होते. यावेळी, प्रवाशांचे तिकीटदर आणि मासिक पाससंदर्भातही त्यांनी माहिती विचारली.
6 / 11
मेट्रोचा सकाळचा आणि रात्रीचा टाइम काय आहे, किती वाजेपर्यंत रात्री मेट्रो सुरू असते, आणि सकाळी किती वाजता सुरू होते, असेही अजित पवारांनी विचारले.
7 / 11
अजित पवार हे चांदणी चौकाच्या नव्या पुलाच्या उद्घाटनासाठी जात असताना त्यांनी रूबी हॉल ते वनाज कॉर्नर पर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत गप्पा मारल्या.
8 / 11
चांदणी चौकाच्या उद्घाटनासाठी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. त्याच कार्यक्रमासाठी जाण्यासाठी अजित पवारांनी मेट्रोने प्रवास केला.
9 / 11
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी, अजित पवारही उपस्थित होते.
10 / 11
गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट हा विस्तारीत मार्ग असून यामुळे आता रूबी हॉलपासून वनाज कॉर्नर आणि सिव्हील कोर्ट ते पिंपरी पर्यंत प्रवास करण्यात येणार आहे.
11 / 11
पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी अजित पवार आज पुण्यात आहेत.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेMetroमेट्रोNCPराष्ट्रवादी काँग्रेस