शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani: “तपास अधिकारी अन् स्कोर्पिओ गाडी मालकाचं फोनवरून संभाषण”; मुकेश अंबानी प्रकरणाला वेगळंच वळण

By प्रविण मरगळे | Published: March 05, 2021 5:26 PM

1 / 10
बिझनेसमॅन मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या अँटेलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी मालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे, मुब्रा येथील खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला, यावरून आता विरोधकांनी या प्रकरणाला विधानसभेत वाचा फोडली आहे.
2 / 10
हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत, हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात यावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी मिळाली होती, त्यात स्फोटक पदार्थ सापडली होती, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे, त्यामुळे तात्काळ हे प्रकरण एनआयएला देण्यात यावं असं ते म्हणाले. (Devendra Fadnavis Demands Handling over Probe into Car Found Near Mukesh Ambani's House to NIA)
3 / 10
तसेच यापुढे जात देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, जून आणि जुलै २०२० मध्ये याच गाडी मालकासोबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं संभाषण झाल्याचा सीडीआर आहे, गाडी मालक आणि सचिन वाझे हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते का? असा प्रश्न उपस्थित होतो.
4 / 10
गाडी मालक ठाण्याचा, तपास अधिकारी ठाण्याचा, गाडी चोरी होऊन ठाण्याहूनच घटनास्थळी कशी आली? सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून नेमलं, एका टेलिग्राम चॅनेलवर जैश उल ए हिंद या संघटनेच्या नावानं ही गाडी आम्ही ठेवलीय असं पत्रक व्हायरल झालं, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी या संघटनेने स्पष्टीकरण दिलं, हे सगळं संशयास्पद आहे
5 / 10
गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची गाडी चोरीला गेली, त्यानंतर ते क्रॉफेड मार्केटला आले, गाडी जेव्हा स्पॉट झाली तेव्हा स्थानिक पोलिसांआधीच सचिन वाझे तेथे कसे पोहचले? त्यांना चिठ्ठी कशी मिळाली? अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे.
6 / 10
त्याचसोबत स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन हे या प्रकरणाचे सर्वात मोठा दुवा होता, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी असं सांगितले होते, कारण तेच या घटनेचे मुख्य धागेदोरे होते. मात्र आता त्यांचाच मृतदेह सापडला आहे, अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक हे प्रकरण आहे असं फडणवीस म्हणाले.
7 / 10
तसेच या गंभीर प्रकरणात गाडी मालकाचा मृतदेह मिळतो, त्यामुळे नक्कीच काही गौडबंगाल आहे, यामागील सत्य बाहेर काढण्यासाठी तात्काळ हे प्रकरण NIA ला देण्यात यावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
8 / 10
पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी१०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती
9 / 10
अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली होती. तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली.
10 / 10
मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी मुंबईत दाखल झालेली इनोव्हा कार ३ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा ठाण्यात जाताना दिसते. मात्र, त्यानंतर ती कुठे गेली, याबाबत माहिती घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. स्फोटके असलेली स्कॉर्पिओ अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ पार्क करणारा आरोपी नंतर इनोव्हा कारमधून पसार झाला होता.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा