शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीसोबतच्या मतभेदांवर खासदार नुसरत जहाँ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, लग्नच वैध नसेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 2:59 PM

1 / 8
बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. नुसरत जहाँ हिने २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन याच्याशी विवाह केला होता. नुसरत जहाँ हिने स्वत:च आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र आता नुसरत जहाँ ही हा विवाह वैध नसल्याचे सांगत आहे.
2 / 8
गेल्या काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या सहा महिन्यापासून आपण एकत्र राहत नसल्याचे नुसरतचा पती निखिल याने सांगितले आहे. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना निखिलने याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे तसेच ती गर्भवती असेल तर ते मुल त्याचे नसल्याचे सांगितले.
3 / 8
आता नुसरत जहाँ हिने या प्रकरणी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणाली की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. त्याशिवाय हा एक Interfaith Marriage (दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह) असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही.
4 / 8
कायदेशीररीत्या हा विवाह वैध नाही आहे. तर हे केवळ एक नाते किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे त्यातून बाजूला होण्यासाठी घटस्फोट घेण्याची गरजच नाही.
5 / 8
नुसरत म्हणाली की, आम्ही खूप आधीच वेगळे झालो होते. मात्र मी याबाबत बोलले नव्हते. कारण मी माझ्या खासगी आयुष्याला माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवू इच्छित होते. आमचे कथित लग्न कायदेशीररीत्या वैध आणि मान्य नाही आहे. कायद्याच्या नजरेत ते लग्न अजिबात नाही आहे.
6 / 8
नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. तसेच निखिलने या प्रकरणात खटलासुद्धा दाखल केला आहे. नुसरत ही माझ्यासोबत नाही तर कुणा अन्य व्यक्तीसोबत राहू इच्छित आहे, असा दावा निखिलने केला आहे.
7 / 8
यादरम्यान नुसरज जहाँ हिचे प्रसिद्ध अभिनेता यशदास गुप्ता याच्यासोबत अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघेही राजस्थानमध्ये फिरण्यासाठी गेले होते. तिथेच या दोघांमधील नात्यास सुरवात झाली, असे सांगण्यात येत आहे.
8 / 8
या संपूर्ण प्रकरणात यशदास गुप्ताकडून कुठलेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. यशदास गुप्ता हा भाजपाचा नेता आहे. तर नुसरत जहाँ ही तृणमूल काँग्रेसची खासदार आहे.
टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँTrinamool Congressतृणमूल काँग्रेसrelationshipरिलेशनशिपwest bengalपश्चिम बंगाल