Usain Bolt : उसेन बोल्ट बनला जुळ्या मुलांचा बाप, बाळांची नावं पण धावपटूच्या कामगिरीला साजेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:26 PM2021-06-21T15:26:08+5:302021-06-21T15:28:30+5:30

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट हा पुन्हा बाप बनला आहे. २०१७मध्ये निवृत्ती जाहीर करणाऱ्या बोल्टच्या घरी रविवारी दोन लहान पाहुणे आले. त्याची प्रेयसी कॅसी बेनेट हिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

फादर्स डेच्या निमित्तानं बोल्टनं इंस्टाग्रामवरू ही आनंदाची बातमी दिली. बोल्ट व बेनेट या दोघांनी मुलांसह फोटो पोस्ट केला आणि त्यात पहिली मुलगी ऑलिम्पियाही दिसत आहे.

बेनेटनं तिच्या पोस्टमध्ये दोन्ही मुलांचे नाव लिहिले आहेत. यात एकाचं नाव थंडर बोल्ट तर दुसऱ्याचं सैंट लियो बोल्ट असं ठेवलं आहे.

बोल्ट आणि बेनेट यांनी बरीच वर्ष त्यांचं नातं लपवून ठेवलं. २०१६मध्ये बोल्टनं तो कोणालातरी डेट करत असल्याचे सांगितले होते.

Read in English