कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:19 AM2020-07-15T11:19:01+5:302020-07-15T11:21:23+5:30

वयाच्या 15व्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नेमबाज अनीश भानवाल यानं 12वी CBSE बोर्डात कमाल करून दाखवली.

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा सर्वात युवा नेमबाज ठरला आणि त्यानं पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.

अनीशनं 2018मध्ये आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकलं होतं.

13 जुलैला 12वी CBSEचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात अनीशने 90 टक्के मिळवले. त्यानं फाईन आर्ट्स विषयात 100 मार्क मिळवले.

त्यानं कुटुंबीयांसह हा आनंद साजरा केला आणि सोशल मीडियावर ते फोटो पोस्ट केले.

अनीशनं आता BBAमध्ये अॅडमिशन घेणार असून त्यानंतर त्याला MBA करायचे आहे. सुरक्षित भविष्यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यानं म्हटलं आहे.