Photo Gallery : तेजस्विनीची सोनेरी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:32 IST2018-04-13T15:32:46+5:302018-04-13T15:32:46+5:30

कोल्हापूरची मराठमोळी नेमबाज तेजस्विनी सावंतने अचूक निशाणा साधत ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
तेजस्विनीनं काल ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं होतं. काल थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकाला तेजस्विनीनं आज गवसणी घातली.
तेजस्विनीनं आज सुवर्णपदकाला गवसणी घालत राष्ट्रकुल स्पर्धांमधील तिच्या पदकांची संख्या सातवर नेली. सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं आतापर्यंत दोन पटकांची कमाई केली आहे.
५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात अंजुम मुदगिल आणि तेजस्विनी सावंतमध्ये सुवर्णपदकासाठी अटीतटीचा सामना झाला. त्यात तेजस्विनीने बाजी मारली.
५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकाराच्या अंतिम लढतीदरम्यानचा एक क्षण.