सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू; व्हिडीओ व्हायरल; अभिनेता म्हणाला, न खेळताच 'गोल्ड' द्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 02:29 PM 2024-08-09T14:29:41+5:30 2024-08-09T14:36:13+5:30
भारताने इतर खेळांच्या तुलनेत तिरंदाजीत खूपच निराशाजनक कामगिरी केली. पॅरिसच्या धरतीवर जगभरातील खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करून पदकासाठी लढत आहेत. भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.
पदक जिंकण्याच्या यादीत अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे देश अनुक्रमे आघाडीवर आहेत. भारताने इतर खेळांच्या तुलनेत तिरंदाजीत खूपच निराशाजनक कामगिरी केली.
पण, दक्षिण कोरियाची तिरंदाज Chou Tzuyu भारतीयांना प्रभावित करून गेली. तिची एक जुनी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टोकियो ऑलिम्पिकमधील असल्याचे कळते.
बॉलिवूड अभिनेता कमाल खानने तर तिला न खेळता सुवर्ण पदक द्यायला हवे अशी मिश्किल टिप्पणी केली.
खरे तर २५ वर्षीय Chou Tzuyu ही एक ॲथलीट नसून गायक आणि डान्सर आहे. १४ जून १९९९ साली जन्मलेल्या या कोरियन खेळाडूने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले.
तिचे पालक पेशाने व्यावसायिक आहेत. आर्थिक बाजू मजबूत असल्याने Chou Tzuyu ने विविध स्पर्धांमध्ये भाग घेत मोठे सहज मोठ्या व्यासपीठापर्यंत मजल मारली.
२०१२ मध्ये ताइनानमध्ये म्युझ परफॉर्मिंग आर्ट्स वर्कशॉप दरम्यान एका स्काउट्सने चाऊ त्झ्यूची प्रतिभा ओळखली. मग नोव्हेंबर २०१२ मध्ये दक्षिण कोरियाला गेली.
परदेशात राहण्याची आणि नवीन भाषा शिकण्याची आव्हाने असतानाही, तिने गायन, नृत्य आणि अभिनय यातील तिची कौशल्ये पटकन सुधारली.
२०१५ मध्ये Chou Tzuyu ने रिॲलिटी सर्व्हायव्हल शो Sixteen मध्ये भाग घेतला, जो JYP Entertainment च्या नवीन मुलींच्या ग्रुपसाठी सदस्य निवडण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता.
तेव्हा ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली अन् तिला एक वेगळी ओळख मिळाली. तिची प्रतिभा, कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली.