Shocking : 14 व्या वर्षी झाला होता Gang Rape; जगातील सर्वोत्तम खेळाडूला छळणारी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:34 PM2020-04-07T17:34:32+5:302020-04-07T17:41:27+5:30

पण, 26 वर्षीय मिक्स मार्शल आर्ट्सच्या या स्टारचा इथवरचा प्रवास हा खडतर मार्गातून आलेला आहे आणि आज तिचे इंस्टाग्रामवर 2.4 मिलियन चाहते आहेत.

UFC म्हणजेच युनायटेड फायटींग चॅम्पियनशीपमधील पैग व्हॅनझँट हे गाजलेलं नाव. जगातील सर्वोत्तम UFC महिला फायटर म्हणून ती ओळखली जाते. त्याशिवाय टीव्ही स्टार म्हणूनही ती गाजलेली आहे.

वयाच्या 14व्या वर्षी तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पैगनं तिच्या Rise: Surviving the Fight of My Life या आत्मचरित्रातून हे धक्कादायक सत्य समोर आणले.

हाय स्कूलच्या एका पार्टीत मद्यधुंद अवस्थेत असताना तिच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचं, पैगनं तिच्या आत्मचरित्रात लिहीले आहे.

ऑरेगोन येथील डेयटोन येथे तिचं बालपण गेलं. तिच्या कुटुंबाचं स्वतःचा डान्स स्टुडिओ होता आणि त्यामुळे तिलाही नृत्याची आवड जडली.

पण, नशीब तिला वेगळ्याच वळणावर घेऊन गेलं. तिच्यावर 14 व्या वर्षी सामुहिक बलात्कार झाला. पण, तिनं हे सत्य लपवून ठेवलं.

एक दिवस हायस्कूलमधून घरी परतल्यावर तिच्या घराभवती असलेल्या झाडांवर कॉन्डम्स लटकलेले तिला दिसले. कोणीतही जाणीवपूर्वक हा प्रकार केला होता.

वयाच्या 15 व्या वर्षी ती माजी UFC चॅम्पियन केन शॅमरोक्स यांच्या जिममध्ये दाखल झाली. डान्स सरावानंतर ती बॉक्सिंग आणि मिक्स मार्शल आर्ट्सचा सराव करू लागली. 2015मध्ये रिबॉकनं तिच्याशी करार केला.

2018मध्ये तिनं Rise: Surviving the Fight of My Life या आत्मचरित्रातून तो प्रसंग सांगितला. तिनं भूतकाळ विसरण्यासाठी आपलं नाव व्हॅनझँट असं केलं आणि तिचे कुटुंबीय नेव्हाडा येथे स्थलांतरीत झाले.

त्यानंतर ती टीव्ही स्टार बनली. 2017मध्ये तिचं आणि मिक्स मार्शल आर्ट्स फायटर आणि माजी कुस्तीपटू ऑस्टीन व्हँडरफोर्डशी प्रेम जुळलं. 2018मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि त्यानंतर लग्नाची घोषणाही केली.

गतवर्षी राचेल ओस्टोव्हिच सोबतच्या लढतीत तिच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर ती रिंगपासून दूर आहे.