शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Padma Shri Faisal Ali Dar: पद्म पुरस्कार जाहीर झालेला फैजल अली दार नक्की कोण? काश्मीरमध्ये दहशतीच्या सावटाखालीही ट्रेनिंग देणं सोडलं नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:21 AM

1 / 7
Padma Shri Faisal Ali Dar: भारत सरकारने मंगळवारी (२५ जानेवारी) १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासह क्रीडा क्षेत्रातील ९ दिग्गजांचा या यादीत समावेश आहे. त्यापैकीच एक म्हणजे कुंग-फू मास्टर फैजल अली दार.
2 / 7
क्रीडा जगतातून फैजल अली दारची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली. पुरस्काराची घोषणा झाल्यावर जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनीही ट्विट करून त्याचे अभिनंदन केले.
3 / 7
फैजल अली दार लहानपणापासूनच हिरो ब्रूस लीचे चित्रपट पाहत असे. ब्रुस ली हा अमेरिकन मार्शल आर्टिस्ट होता. ब्रुस ली याच्या चित्रपटांतून प्रेरणा घेऊन फैजलमध्ये कुंग-फू बद्दल आवड निर्माण झाली आणि त्याने त्यातच आपले करिअर घडवले.
4 / 7
२००३ साली फैजलने कुंग-फू शिकण्यास सुरुवात केली. फैजलने प्रशिक्षक कुलदीप हांडू यांच्याकडून कुंग फू चे ज्ञान मिळवले. तो कुलदीप सरांना आपला आदर्श मानतो.
5 / 7
माजी मार्शल आर्ट चॅम्पियन फैजल अली दार जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात राहतो. तेथे त्याने एक अकादमीदेखील सुरू केली आहे. त्या अकादमीत जागतिक किक-बॉक्सिंग चॅम्पियन तजामुल इस्लाम आणि कराटे चॅम्पियन हसिम मन्सूर या तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. फैजल अली दार महिला सशक्तीकरण व सबलीकरण याबाबतही कार्यरत आहे.
6 / 7
बांदीपोरा हा दहशतवादग्रस्त भाग मानला जातो. फैझलला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या खूप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. फैजल अली दार हा जम्मू-काश्मीरचा आहे. दहशतीच्या सावटाखाली तो आपली मार्शल आर्ट अकादमी चालवत आहे.
7 / 7
या भागात अशांतता असतानाही त्याने प्रशिक्षण घेणं आणि इतरांना शिकवणं सोडलं नाही. खडतर परिस्थितीतही अकादमी चालवल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळेच फैजलला 'खेळ व शांतता'मध्ये डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद