नीरजचा 'भाव' वधारला, रोहित शर्माला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:29 PM2021-09-08T13:29:31+5:302021-09-08T13:46:15+5:30

नीरजची सहजता, सरलता आणि देशप्रेमामुळे तो दिग्गजांचाही चाहता बनला आहे. भारताला अॅथलेटमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून देत, त्याने इतिहास रचला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने कोट्यवधी भारतीयांचीही मने जिंकली आहेत. त्यामुळेच, त्याची फॅन फॉलोविंग वाढली आहे.

नीरजची सहजता, सरलता आणि देशप्रेमामुळे तो दिग्गजांचाही चाहता बनला आहे. भारताला अॅथलेटमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून देत, त्याने इतिहास रचला आहे.

नीरजच्या कामगिरीची दखल देशाने घेतली, आता देश-विदेशातील जाहिरात कंपन्याही त्याची दखल घेताना दिसत आहेत. जाहिरात विश्वातही नीरजला सोनेरी झळाली मिळाली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि नीरज यांच्यात सध्या जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. क्रिकेटचा विराट आणि क्रीडा विश्वाचा नीरज यांच्यात जाहिरात विश्वातील स्पर्धा सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार नीरजनं जाहिरातीची फी दहापटीने वाढवली. त्यामुळे, जाहिरात विश्वात आता नीरजच्या पुढे केवळ विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

ऑलिम्पिकपूर्वी नीरज जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला 15 ते 25 लाख रूपये कमावत होता. आता, त्याची फी 10 पट अधिक वाढली आहे. नीरजपेक्षा विराट जाहिरातीसाठी अधिक मानधन घेतो.

नीरजने रोहित शर्मा, केएल राहुल यांनाही मागे टाकले आहे. ते जाहिरातीसाठी वार्षिक 50 लाख ते 1 कोटी फी घेतात. आता नीरज यांच्यापुढे गेला आहे.

'इकोनॉमिक्स टाईम्स'च्या वृत्तानुसार नीरजचं काम पाहण्याऱ्या कंपनीची सध्या लग्झरी ऑटो आणि कपड्याच्या ब्रँडशी चर्चा सुरू आहे. एकूण 5 ते 6 डीलबाबत त्याची चर्चा सुरू आहे.

पॅरीसमध्ये 2024 साली होणाऱ्या ऑलिम्पिकपर्यंतचे हे करार आहेत, अशी माहिती नीरजचं व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तफा घोष यांनी दिली आहे.

नीरजने आता जाहिरात विश्वातही घोडदौड सुरू केली असून त्याचा भाव चांगलाच वधारला आहे