Neeraj Chopra: मुंबईतील रेस्टॉरंटबाहेर स्टायलिश लूकमध्ये दिसला नीरज चोप्रा, फॅन्स, फोटोग्राफर्सची गर्दी, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 08:08 PM2021-09-07T20:08:31+5:302021-09-07T20:12:26+5:30

Neeraj Chopra in Mumbai: भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा नीयज चोप्रा सध्या यूथ आयकॉन बनला आहे. त्यामुळे सध्या तो जिथे जातो तिथे फॅन्सची गर्दी दिसून येत आहे.

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा नीयज चोप्रा सध्या यूथ आयकॉन बनला आहे. त्यामुळे सध्या तो जिथे जातो तिथे फॅन्सची गर्दी दिसून येत आहे. निरज चोप्राभोवती प्रसिद्धीचे वलय निर्माण झाल्याने तो पापाराझींचाही आवडता स्टार बनला बनला आहे.

दरम्यान, नीरज चोप्रा सध्या मुंबईमध्ये आहे. तिथे तो एका पॉश रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आला असताना पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तो या रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर त्याच्या भोवती पापाराझी आणि फॅन्सचा गराडा पडला. नीरजने गुलाबी रंगाचे शर्ट, काळी पँट आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली होती. या लूकमध्ये तो खूप स्टायलीश दिसत होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आल्यापासून नीरज चोप्रा खूप बिझी आहे. विविध सन्मान सोहळे आणि इव्हेंट्समध्ये तो भाग घेत आहे. त्यामुले त्याची प्रकृतीही बिघडली होती. मात्र आता तो तंदुरुस्त झाला आहे. मात्र त्याचे इव्हेंट्स अद्यापही सुरू आहेत.

नीरज चोप्राच्या खेळाबाबत बोलायचे झाल्यास टोकियोमधून सुवर्णपदक जिंकून परतल्यापासून तो ट्रॅकवर पुनरागमन करू शकलेला नाही. त्याला यावर्षी डायमंड लीगमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र खराब प्रकृतीमुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागले.

नीरज चोप्राने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जगभरातील आघाडीच्या भालाफेकपटूंचे आव्हान मोडीत काढत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.