न्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:47 PM2020-07-02T14:47:45+5:302020-07-02T14:50:10+5:30

मिक्स्ड मार्शल आर्ट्समधील प्रसिद्ध खेळाडू जिना कॅरानो हिनं काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. पण, इंस्टाग्रामनं तिचा हा फोटो डिलीट केला.

इंस्टाग्रामच्या म्हणण्यानुसार तिचा हा फोटो आपत्तिजनक होता. त्यामुळे तो हटवण्यात आला.

इंस्टाग्रामच्या या कारवाईनंतर जिना चांगलीच भडकली. हा अभिवक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे तिनं ट्विट केलं. तिनं लिहिलं की,''मी कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलेलं नाही.''

जिनाच्या टॉपलेस फोटोवर ब्राझिलची जियु-जित्सु मास्टर रेंजो ग्रेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यांनी लिहिलं की, तुला अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही. तू अशीच खुप सुंदर दिसतेस. त्यामुळे अशा फोटोंची तुला गरज नाही.''

जिनानं मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत.

तिनं हॉलिवूडच्या चित्रपटांतही काम केलं आहे. फास्ट अँड फ्युरियस 6 आणि डेडपूल या सुपरहिट चित्रपटात ती दिसली होती.