Nick Kyrgios kissing girlfriend Costeen Hatzi: खेळाचा सराव अन् गर्लफ्रेंडला किस... टेनिस कोर्टवरच्या फोटोची रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 07:56 PM2022-01-17T19:56:54+5:302022-01-17T20:19:45+5:30

ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सराव सुरू असतानाच टेनिस कोर्टवर घडला असा प्रकार

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियन टेनिसस्टार निक कार्गिओसदेखील या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेआधी सराव सत्रात तो टेनिस कोर्टवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसला.

२६ वर्षीय निकला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून तो नुकताच बरा झाला आणि तो टेनिस कोर्टवर सरावासाठी उतरला.

मेलबर्नमध्ये निक सरावासाठी आला त्यावेळी त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड कोस्टीन हॅट्झीदेखील (Costeen Hatzi) हजर होती.

सराव सत्रादरम्यान निक ची गर्लफ्रेंड कोस्टीन तेथेच टेनिस कोर्टच्या बाजूला बसून राहिली होती. त्यावेळी निकने तिला सरावादरम्यान किस केलं.

निकने या सराव सत्रातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

एका फोटोत तो आपल्या गर्लफ्रेंडला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तो फोटोग्राफर्ससाठी पोज करताना दिसत आहे.

निक कोस्टीनसोबतच्या रिलेशनशीपबद्दल या वर्षाच्या सुरूवातीला उघडपणे बोलला होता.

कोस्टीन २१ वर्षांची आहे. ती सिडनीत वास्तव्यास आहे. ती स्वत: एक ब्लॉगर आहे.

दोघांनी त्यांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यातच सराव सत्रादरम्यान किस करतानाचा फोटो निकने शेअर केला आहे.

सर्व फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम (निक कर्गिओस आणि कॉस्टीन हॅट्झी)