Tokyo Olympics: 97 वर्षांत देशाला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिलं, सरकारनं बक्षीस म्हणून 5 कोटी अन् घर दिलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:36 PM2021-07-27T18:36:10+5:302021-07-27T18:54:08+5:30

Tokyo Olympics: Weightlifter Hidilyn Diaz Of Philippines Hailed For Historic Gold : मागच्या वर्षी पेरू येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी ती मलेशियात अडकली होती. कोरोनामुळे सरकारनं पाच महिन्यांची प्रवास बंदी घातली होती.

Tokyo Olympics: Weightlifter Hidilyn Diaz Of Philippines Hailed For Historic Gold : फिलिपिन्सच्या हिडिलीन डिआझनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. तिनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाला पहिलंवहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिलं.

30 वर्षीय डिआझनं चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला अन् ती फिलिपिन्सची पहिली ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती खेळीडू ठरली. तिनं 224 किलो वजन उचलत ऑलिम्पिक रिकॉर्डही नोंदवला.

''मी आता 30 वर्षांची आहे आणि मला वाटलं की माझ्या कामगिरीचा आलेख उतरत्या क्रमाने जाईल, परंतु पदक जिंकल्यानंतर मलाच सुखद धक्का बसला,''असे डिआझनं सांगितले.

फिलिपिन्सचे अध्यक्षीय प्रवक्ता हॅरी रोक्यू यांनी डिआझचे कौतुक केले अन् तिनं देशाची मान अभिमानानं उंचावल्याचे सांगत तिचे अभिनंदन केले. डिआझनं चीनच्या लिओ क्वियूनला ( 223 किलो) रौप्य, तर कझाकस्तानच्या झुल्फिया चिनशानलो ( 213 किलो) हिला कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले.

पॅऱिसमध्ये होणाऱ्या पुढील ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेण्याचा निर्धार डिआझनं यावेळी व्यक्त केला. सुवर्णपदक गळ्यात घालताच डिआझ ढसाढसा रडू लागली. मागच्या वर्षी पेरू येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी ती मलेशियात अडकली होती. कोरोनामुळे सरकारनं पाच महिन्यांची प्रवास बंदी घातली होती.

तेव्हा तिनं घरीच जिम बनवली आणि पाण्याच्या बॉटल्ससह सराव केला. फिलिपिन्स 1924 पासून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेत आहेत, परंतु आतापर्यंत त्यांना केवळ 3 रौप्य व 7 कांस्यपदक जिंकता आली होती, पण डिआझनं देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं.