Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 11:02 IST2020-05-05T10:59:17+5:302020-05-05T11:02:56+5:30

काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले.
44 वर्षीय कर्नल आशुतोष शर्मा 21 राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे कमांडिंग होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर कमांडर मेजर अनुज सूद (30), नायक राजेश कुमार (29), लान्स नायक दिनेश सिंह ( 24) आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक सागीर पठाण उर्फ काझी (41) हे त्याच्यासमवेत होते.
त्यांनी घरात प्रवेश करून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले खरे; परंतु ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. या शहीदांना कुस्तीपटू बबिता फोगाटनं श्रद्धांजली वाहिली.
तिनं ट्विट केलं की,''देशाच्या रक्षणासाठी हसतहसत प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना वंदन. त्यांच्या त्यागाचा भारताला अभिमान आहे.''
यापुढे बबितानं ट्विट केलं की,''उत्तर नक्की मिळेल.''