शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cristiano Ronaldo: गरिबीत गेले लहानपण...! आता आहे राजेशाही जीवन; पाहा रोनाल्डोचं घर अन् 'गाड्यांचा राजवाडा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 4:56 PM

1 / 9
फिफा विश्वचषक 2022 पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी काही खास राहिला नाही. उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभूत झाल्याने पोर्तुगालचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. या पराभवानंतर रोनाल्डो डोळ्यात अश्रू घेऊन मैदानाबाहेर आला. यासह 37 वर्षीय रोनाल्डोचे विश्वचषक जिंकण्याचे संभाव्य स्वप्नही भंगल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 9
रोनाल्डोचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न कदाचित पूर्ण झाले नसेल, परंतु या खेळातून त्याने सर्व काही साध्य केले आहे. मात्र रोनाल्डोची कहाणी खूप संघर्षमय राहिली आहे, त्याचे बालपण अतिशय गरिबीत गेले.
3 / 9
रोनाल्डोची आजची जीवनशैली एखाद्या राजापेक्षा कमी नाही. त्याच्याकडे अनेक लक्झरी कारचा स्टॉक आहे. तसेच राहण्यासाठी घरासारखा राजवाडा आहे. यासोबतच त्याने आपल्या मुलांसाठी एक आलिशान हॉटेलही खरेदी केले आहे.
4 / 9
खरं तर रोनाल्डोकडे जवळपास 20 लक्झरी कार आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी, बुगाटी वेरॉन आणि बीएमडब्ल्यू अशा कोट्यवधी किमतीच्या गाड्यांचा समावेश आहे. रोनाल्डोकडे अशा काही गाड्या आहेत ज्या जगातील मोजक्याच लोकांकडे आहे.
5 / 9
जर आपण रोनाल्डोची सध्याची एकूण संपत्ती पाहिली तर ती सुमारे 490 मिलियनहून अधिक आहे. 2020 मध्ये तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर होता. या वर्षी त्याने 793 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
6 / 9
2020 मध्ये रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेंड आणि मुलांसाठी एक हॉटेल खरेदी केले होते. या हॉटेलची किंमत सुमारे 350 कोटी रुपये आहे. हॉटेलशिवाय रोनाल्डोकडे एक लक्झरी क्रूझ जहाज देखील आहे.
7 / 9
रोनाल्डोच्या उत्पन्नाचा स्त्रोत वेगवेगळ्या फुटबॉल क्लबकडून मिळालेल्या रकमेव्यतिरिक्त जाहीरातही आहे. याशिवाय तो सोशल मीडिया पोस्टमधूनही भरपूर कमाई करतो. इंन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करण्यासाठी त्याला सुमारे 7 कोटी रुपये मिळतात.
8 / 9
ख्रिस्तियानो रोनाल्डोचे बालपण अतिशय गरिबीचे गेले असे बोलले जाते. त्याने शालेय जीवनापासून फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली होती. या खेळातील त्याच्या प्रतिभेमुळे त्याला इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने वयाच्या 18 व्या वर्षी 17 लाख डॉलर्समध्ये करारबद्ध केले. यानंतर तो रिअल माद्रिद, पीएसजी जुव्हेंटस या क्लबकडूनही खेळला.
9 / 9
लक्षणीय बाब म्हणजे रोनाल्डोने अद्याप लग्न केले नाही. मात्र त्याच्या 3 गर्लफ्रेंड राहिल्या असून त्याला 4 मुले आहेत. आता असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव जॉर्जियाना रॉड्रिग्ज आहे, जिच्यापासून त्याला एक मुलगी झाली आहे. जॉर्जियाना रॉड्रिग्जच्या आधी तो रशियन मॉडेल इरिनासोबतही चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होता.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलPortugalपोर्तुगाल