Farah Khan commented on former tennis star Sania Mirza's photo
PHOTOS : सानिया मिर्झाचा हटके अंदाज! फराह खानची 'ती' लक्षवेधी कमेंट; चाहतेही अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:51 AM2024-10-01T11:51:29+5:302024-10-01T12:08:31+5:30Join usJoin usNext सानिया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नाना कारणांनी चर्चेत असणारी सानिया मिर्झा. भारताची टेनिस आयकॉन म्हणून तिची ओळख आहे. सानिया तिच्या व्यावसायिक जीवनासह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे देखील चर्चेत असते. नेहमी नवनवीन फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहणारी सानिया अलीकडेच तिच्या वैवाहिक जीवनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा विभक्त झाले आहेत. याप्रकरणी सानियाने अद्याप जाहीरपणे भाष्य करणे टाळले आहे. मात्र, अनेकदा तिने सोशल मीडियावर प्रेरणादायी पोस्ट करुन संकेत दिल्याचे पाहायला मिळाले. आता तिने काही हटके फोटो पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधले. सानियाच्या या फोटोंवर फराह खानने 'तू कुठे चालली आहेस?' अशी लक्षवेधी कमेंट केली. यावर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. अलीकडेच टेनिस प्रीमिअर लीगच्या सहाव्या हंगामासाठी बुधवारी मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी आठ फ्रँचायझींनी खेळाडूंवर बोली लावली. या कार्यक्रमाला सानिया मिर्झाची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एका व्यासपीठावर दिसले. भारताची स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झा फावल्या वेळात आपल्या मुलासोबत वेळ घालवते. ती सातत्याने सोशल मीडियावर याची झलक पोस्ट करत असते. सानिया आणि शोएब मलिक हे वेगळे झाले आहेत. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या.टॅग्स :सानिया मिर्झाटेनिसफराह खानSania MirzaTennisFarah Khan