८ वर्षे डेटिंग! ५ लेकरांचे आई-बाबा असलेल्या रोनाल्डो- जॉर्जीना रोड्रिगसनं आता उरकला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:26 IST
1 / 9फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्ज या जोडीनं आठ वर्षांच्या डेटिंगनंतर आता साखरपुडा उरकला आहे.2 / 9जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोत तिने रोनाल्डोचा हातात हात घेतलेल्या फोटोसह तिने आपली एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.3 / 9ओव्हप-शेप महागड्या डायमंड रिंगच्या फोटोला जॉर्जियानं खास कॅप्शनही दिलंय. “हो, मी तयार आहे.. या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात मी तुझी आहे' अशा अशायाच्या शब्दात तिने रोनाल्डोवर प्रेम व्यक्त केले आहे.4 / 9ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिया रोड्रिग्ज ही दोघं जवळपास आठ वर्षे एकमेकांसोबत आहेत. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या जोडीला पाच मुलं आहेत. आता त्यांनी लग्नाचा विचार पक्का केलाय.5 / 9ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रोड्रिग्ज यांची पहिली भेट ही २०१६ मध्ये मॅद्रिदच्या UCCI® Store मध्ये झाली. जिथं जॉर्जिया सेल्स असिस्टंटच्या रुपात काम करायची.6 / 9रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी २०१७ मध्ये नात्यात असल्याची गोष्ट जग जाहीर केली होती. स्वित्झर्लंडमधील फिफा पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा दोघांनी जोडीनं हजेरी लावली होती. 7 / 9दोघांच्या नात्यातील खास क्षणाशिवाय महागड्या एंगेजमेंट रिंगबद्दलही त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता नक्की असेल. ब्रियोनी रेमंड नुसार, जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू असलेल्या रोनाल्डोनं लाँग टाइम गर्लफ्रेंडला जी रिंग दिलीये तो डायमंड कमीत कमी १५ कॅरेटचा असेल. ज्याची किंमत ५ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी असू शकते.8 / 9ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून दोघेही सातत्याने एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसले आहे.9 / 9रोमँटिंक अन् स्टायलिश अंदाजातील फोटो पाहिल्यावर ही जोडी लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडायचा. अखेल दोघांनी लग्नाची पहिली पायरी चढली आहे.