शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'कॅप्टन कूल' अनुप कुमार निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:59 AM

1 / 7
भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्ती जाहीर केली.
2 / 7
हरयाणापासून 247 किलोमीटर दूर असलेल्या पार्ला गावात जन्मलेल्या अनुपने प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स संघाचे नेतृत्व सांभाळले आहे.
3 / 7
2018च्या मोसमात त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला 13 सामन्यांत 50 गुणांची कमाई करता आली, तर त्याच्या नेतृत्वाखाली जयपूरने 14 पैकी 4 सामने जिंकले.
4 / 7
प्रो कबड्डीत त्याने एकूण 91 सामन्यांत 596 गुण कमावले आहेत आणि सर्वाधिक गुण करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे.
5 / 7
अनुपची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2006 साली दक्षिण आशिया स्पर्धेपासून सुरुवात झाली. त्यानंतर तो सातत्याने भारतीय संघाचा सदस्य आहे.
6 / 7
अनुपला 2012 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
7 / 7
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 मध्ये विश्वचषक जिंकला.
टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगKabaddiकबड्डी