100 कोटींचे जेट, नो फ्लाय झोनमध्ये बंगला अन्...Lionel Messi जगतो आलिशान लाईफ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 03:40 PM2022-11-13T15:40:07+5:302022-11-13T15:43:47+5:30

BYJUने नुकतच फुटबॉलर लिओनेल मेस्सीला जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे.

जगातील अग्रगण्य एज्युटेक कंपनी असलेल्या BYJUने अलीकडेच फुटबॉल स्टार आणि जागतिक स्पोर्ट्स आयकॉन लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) त्यांचा पहिला जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. एज्युकेशन फॉर ऑल या कंपनीच्या जागतिक ब्रँडसाठी हा करार करण्यात आला आहे. मेस्सीचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत, तुम्हीही त्याचे चाहते असाल. पण, तुम्हाला या जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अॅथलीटच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का? चला तर मग जाणून घेऊ मेसीबद्दल...

लिओनेल मेस्सी हे फुटबॉल विश्वातील सर्वात मोठे नाव आहे, त्याचे लाखो-करोडो फॉलोअर्स आहेत. मेस्सी जितके मोठे नाव आहे, त्याची लाईफस्टाईलही लक्झरी आहे. फुटबॉलचा हा दिग्गज केवळ मैदानावरच नाही, तर जगभरातील खेळाडूंमध्ये कमाईच्या बाबतीत सर्वाधिक आहे. इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, मेस्सीची एकूण संपत्ती $600 मिलियन किंवा सुमारे 4,830 कोटी रुपये आहे. या संपत्तीसह, तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा ऍथलीट आहे. खेळाव्यतिरिक्त तो अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीतूनही मोठी कमाई करतो.

फुटबॉलचा हा सर्वात मोठा स्टार राजवाड्याप्रमाणे घरात राहतो. लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनामध्ये आलिशान बंगला आहे. समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्यात एक खाजगी फुटबॉल मैदान आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 519 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, मेस्सीचा हा बंगला नो फ्लाय झोनमध्येही येतो, म्हणजेच त्यावरून फ्लाइट पास करण्यावर बंदी आहे. केवळ आलिशान बंगलाच नाही तर मेस्सीचे स्वतःचे एक आलिशान हॉटेल देखील आहे. MiM Sitges हॉटेल हे 77-बेडरूमचे हॉटेल आहे ज्याचे भाडे प्रति रात्र £105 पर्यंत आहे.

फुटबॉल ग्राउंड व्यतिरिक्त आपल्या खेळासोबतच जीवनशैलीमुळे चर्चेत असलेला बायजूचा ब्राँझ अॅम्बेसेडर लिओनेल मेस्सीच्या आलिशान घरात अनेक सुविधा आहेत. घरात एक स्विमिंग पूल, इनडोअर जिम आणि मुलांसाठी खेळाचे मैदान आहे. तसेच, घरातूनच बेलेरिक समुद्राचे दृश्यही दिसते. Mim Sitges व्यतिरिक्त इतर अनेक शहरांमध्ये मेसीची हॉटेल्स आहेत. पण हे सर्वोत्तम आहे. या हॉटेलच्या वर एक बार देखील आहे, जिथून संपूर्ण शहराचे दृश्य दिसते.

केवळ घर आणि हॉटेलच नाही, तर लिओनेल मेस्सीची लक्झरी लाइफस्टाइल त्याच्या प्रायव्हेट जेटला पाहूनही कळू शकते. मेस्सी अनेकदा आपल्या कुटुंबासह या जेटमध्ये प्रवास करताना दिसतो. फुटबॉल स्टारच्या खाजगी जेटच्या मागे 10 क्रमांकाचे चिन्ह देखील आहे. विशेष म्हणजे त्याचा जर्सी क्रमांकही 10 आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या प्रायव्हेट जेटची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. लिओनेल मेस्सीचे हे जेट खास अर्जेंटिनाच्या एका कंपनीने डिझाइन केले आहे. यात दोन बाथरूम, एक स्वयंपाकघर आणि 16 पेक्षा जास्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.

इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, मेस्सीकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. यामध्ये अनेक हायस्पीड कारचा समावेश आहे. त्याच्या कलेक्शनबद्दल बोलायचे तर, $2 मिलियन किमतीच्या Pagani Zonda Tricolore व्यतिरिक्त, Masserati GranTurismo, Ferrari F430 Spyder, Dodge Charger SRT8 आणि Audi-Range Rover सारख्या अनेक महागड्या कार आहेत. 2016 मध्ये त्यांने फेरारी खरेदी केली होती.