व्हॉट अ स्ट्रोक; पोलीस महासंचालक हेमंत नागराळे गोल्फ खेळतात तेव्हा...

By पूनम अपराज | Published: February 23, 2021 09:42 PM2021-02-23T21:42:23+5:302021-02-28T20:23:13+5:30

Director General of Police Hemant Nagrale plays golf : सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांबरोबरच विस्तारित १८ होल्सचे आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स साकारण्यात आला. सिडको मास्टर्स कप - २०२१ गोल्फ सामन्याचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी गोल्फ कोर्समध्ये गोल्फ खेळाची मज्जा खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी लुटली. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, कॉर्पोरेट पार्क आणि विस्तारित गोल्फ कोर्स हे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नगरविकास क्षेत्राला नवीन दिशा देणारे असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

ल्फसारख्या प्रतिष्ठित खेळाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आयोजित करून राज्याच्या व देशाच्या पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे खारघर नोडमध्ये ५२ हेक्टरवर खारघर व्हॅली गोल्फ कोर्स मैदान विकसित करण्यात आले आहे.

गोल्फ कोर्समध्ये सिडकोचा मॅग्नम-ओपस गोल्फ व कंट्री क्लब, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ९ होल्सचे गोल्फ कोर्स यांचा समावेश होतो.

लवकरच ९ होल्सच्या गोल्फ कोर्सचा १८ होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार करण्यात येणार आहे.

यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, टेनिसपटू लिएंडर पेस आदी उपस्थित होते.

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे  यांनी नवी मुंबई येथील सध्या '९ होल' असलेल्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सच्या विस्तारास हिरवा झेंडा दाखवला. 

'सिडको मास्टर्स कप' मध्ये सहभागी झाल्याबद्दल नगराळे यांचा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी  सत्कार केला.

नगराळे यांचे गोल्फ खेळताना फोटो महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.