पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण नसल्याने शिवसैनिकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 22:41 IST2018-02-18T22:36:45+5:302018-02-18T22:41:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबई दौऱ्यातील कार्यक्रमांचे निमंत्रण शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी नवी मुंबईत जोरदार विरोध प्रदर्शन केले. ( सर्व छायाचित्रे - भालचंद्र जुमलेदार)

शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनामध्ये शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलकांना थोपविताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.