फेसबुकमध्ये अ‍ॅनिमेटेड अवतार, तुम्ही ट्राय केलं का नवं फिचर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:35 PM2020-07-01T12:35:05+5:302020-07-01T12:55:41+5:30

आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आमि नवनवीन फिचरमुळेच फेसबुक अब्जावधी लोकांची पसंत बनलं आहे. आता फेसबुकने आणखी एन नवं फिचर अॅड केलं आहे.

फेसुबकने आपल्या वेब इंटरफेसच्या डिझाईनमध्ये बद करत, अॅपचा वापर अधिक सोयीचा केला आहे. नव्या बदलासह कंपनीने नवीन फिचरही अॅड केलं आहे.

नव्या फिचरनुसार तुम्हाला तुमचा अॅनिमेटेड अवतार तयार करता येणार आहे, म्हणजे कार्टुनस्टाईल तुम्हाला तुमचा फोटो बनवता येईल.

फेसबुक अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये हे avatars नावाने हे फिचर सहभागी असून युजर्संच्या सहाय्याने तुम्हाला हे कार्टुन पिक तयार करता येईल.

लॉकडाऊन काळात फेसबुकवर वापर अधिक सुरु असून युजर्स आपला जास्त वेळ फेसबुकवर खर्च करत आहेत. त्यामुळेच युजर्संचं इंटरिएक्शन वाढलं आहे.

नव्याने अॅड झालेले हे अवतान नावाचे फिचर अनेक नवीन चेहरे, हेअर स्टाईल आणि आऊटफिट्सला सपोर्ट करत आहे.

केवळ भारतीय युजर्संसाठीच हे नवीन फिचर आणि त्यातील कार्टुन तयार करण्यात आले आहेत.

युजर्सना एकदा आपला अवतार या फिचरमधून बनवावा लागणार आहे, त्यानंतर मेसेंजर आणि कमेंट्स मध्ये स्वताचे कार्टुन वापरता येईल.

फेसबुक आणि मेसेंजरचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट केल्यानंतर, तुम्हाला अवतार क्रिएट करता येईल. स्माईली आयकॉनवर टॅप केल्यानंतर <Make your Avtar> हा ऑप्शन दिसेल.

या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर, एक स्क्रीन दिसणार असून ज्यावर काळा चेहरा दिसून येईल. तेथेच तुम्ही चेहऱ्याचा रंग, कपडे, हेअरस्टाईल सर्वकाही सिलेक्ट करु शकता. तर, बाजुलाचा मिरर आयकॉनही दिसणार आहे. त्याचाही वापर तुमच्या चेहऱ्यासाठी करता येईल. अखेर डन म्हणून तुम्ही अवतार बनवू शकता.