शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tirupati Temple News: तिरुपती मंदिरात दर्शनाची पद्धत बदलली, १ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी काय करावं लागणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:30 AM

1 / 8
Tirupati Temple News: आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिर १ मार्चपासून भाविकांना दर्शनाची आणि राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. दर्शन आणि निवास वाटपात पारदर्शकता यावी यासाठी ही फेस रेक्गनिशन सिस्टम सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या हजारो यात्रेकरूंना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
2 / 8
ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होण्याची अपेक्षा आहे. मंदिराच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देताना तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) १ मार्चपासून वैकुंटम २ आणि AMS प्रणालीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान सुरू करण्यास तयार आहे असं सांगण्यात आलं आहे.
3 / 8
टोकनलेस तंत्रज्ञान आणि घरांच्या वाटप प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्याचा विचार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या गर्दीला आवश्यक सेवा अधिक प्रभावीपणे मिळू शकेल.
4 / 8
तिरुमला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व दर्शन कॉम्प्लेक्स आणि डिपॉझिट रिफंड काउंटर' येथे टोकन घेण्यासाठी भाविकांना जास्त वेळ रोखून धरले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी फेस रिकग्निशनचा वापर केला जाईल. तिरुमला येथे सुमारे ७ हजार निवासी सुविधा आहेत, त्यापैकी १ हजार आरक्षित सदनिका आहेत आणि उर्वरित भाविकांना राहण्यासाठी उपलब्ध आहेत.
5 / 8
तिरुमला तिरुपती देवस्थानने १९३३ नंतर प्रथमच नोव्हेंबर २०२२ मध्ये आपली निव्वळ संपत्ती जाहीर केली होती. देवस्थानची एकूण मालमत्ता २.५ लाख कोटी रुपये (सुमारे ३० अब्ज अमेरिकन डॉलर्स) पेक्षा जास्त आहे. जे IT सेवा कंपनी विप्रो, पेय कंपनी नेस्ले आणि सरकारी मालकीच्या तेल दिग्गज ONGC आणि IOC च्या बाजार भांडवलापेक्षा जास्त आहे.
6 / 8
मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रस्ट सतत समृद्ध होत आहे. टेकडीवर बांधलेल्या या मंदिरात भाविकांकडून रोख आणि सोन्याचे दान सातत्याने वाढत आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे मंदिराला बँकांमधील मुदत ठेवींपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.
7 / 8
फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या २०२२-२३ साठी सुमारे ३,१०० कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पात, तिरुमला तिरुपती देवस्थानमने बँकांमधील रोख ठेवींमधून व्याज म्हणून ६६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय केवळ रोख देणगीच्या स्वरूपात १,००० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
8 / 8
दरवर्षी सुमारे २.५ कोटी भाविक तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिरात दर्शनासाठी पोहोचतात. हे भाविक मंदिरात मोठ्या प्रमाणात रोख आणि सोने अर्पण करतात. या दानामुळे तिरुपती मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे.
टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट