उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:15 IST
1 / 5उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ईव्हीएम का वापरली जात नाही? उत्तर : या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना उमेदवारांसमोर पसंतीक्रम लिहावा लागतो- पहिली पसंती, दुसरी, तिसरी पसंती अशा स्वरूपात. मतमोजणी ही या पसंतीवर आधारित असते. अशी प्राथमिकताधारित मतमोजणी ईव्हीएम तंत्रज्ञानात शक्य नाही.2 / 5ईव्हीएम न वापरण्यामागे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे काय? उत्तर : अधिकाऱ्यांच्या मते, ईव्हीएमची रचना सरळ बहुमताने होणाऱ्या निवडणुकांसाठी केली आहे. उपराष्ट्रपती निवडणूक ही ‘प्रमाणानुसार प्रतिनिधित्व’ व ‘एकच हस्तांतरणीय मत’ या पद्धतीवर चालते. यासाठी वेगळी तंत्रज्ञानयुक्त ईव्हीएम तयार करावी लागेल.3 / 5मतमोजणीची प्रक्रिया कशी चालते? उत्तर : ज्या उमेदवाराला आवश्यक कोट्याइतकी मते मिळतात तो थेट विजयी ठरतो. तो कोटा गाठला नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीनुसार मते इतर उमेदवारांना हस्तांतरित केली जातात.4 / 5उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान कोण करतात? उत्तर : राज्यसभेतील २३३ निवडून आलेले सदस्य, राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित १२ सदस्य व लोकसभेतील ५४३ सदस्य या निवडणुकीत मतदान करतात. मतदानासाठी एकूण ७८८ सदस्य पात्र असतात. मात्र, प्रत्यक्षात किती सदस्य अस्तित्वात आहेत याची अंतिम गणना निवडणूक आयोग करतो.5 / 5प्रत्यक्षात मतदान कसे केले जाते? उत्तर : प्रत्येक मतदाराला (खासदाराला) मतपत्रिकेवर उमेदवारांसमोर १, २, ३ असे क्रमांक रोमन आकड्यांत लिहायचे असतात. हे क्रमांक उमेदवारांच्या पसंतीसाठी असतात. मतदान गुप्त ठेवले जाते. यासाठी निवडणूक आयोगाने पुरविलेला विशेष पेनच वापरावा लागतो.