शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंदिरा गांधींचे सिक्युरीटी चीफ ते आता मिझोरमच्या CM पदाचे दावेदार, कोण आहेत लालदुहोमा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 12:13 PM

1 / 6
Who is Lalduhoma, Probable CM of Mizoram : मिझोरममध्ये मतमोजणी सुरू असताना, 74 वर्षीय माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा आणि त्यांचा पक्ष, झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) यांच्यावर साऱ्यांचे लक्ष आहे. एक्झिट पोलने मिझोराममध्ये ZPM ला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तोच अंदाज खरा होताना दिसत आहे.
2 / 6
एक्झिट पोलमध्ये ZPM ला 28-35 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. निवडणुकीचे निकालही एक्झिट पोल योग्य असल्याचे सिद्ध करत आहेत. ZPM ने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे आणि MNF पक्षाचे अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मिझोरमचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या एका नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे लालदुहोमा.
3 / 6
आयपीएस अधिकारी असलेले लालदुहोमा यांचा राजकारणातील प्रवास विलक्षण आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. गोवा केडरच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले लालदुहोमा नंतर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यापुढे राष्ट्रीय राजधानीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेचे ते प्रभारी बनले.
4 / 6
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ZPMची स्थापना केली. 1984 मध्ये लोकसभेत त्यांनी प्रवेश केला. पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेले संसदेचे ते पहिले सदस्य बनले तेव्हा त्यांना महत्त्वपूर्ण आव्हानाचा सामना करावा लागला.
5 / 6
२०२० मध्ये लालदुहोमा यांना पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्रत ठरवले गेले. पण २०२१ मध्ये सेरछिप जागेसाठी पोटनिवडणूक जिंकून त्यांनी दमदार पुनरागमन केले. सध्या हाच पक्ष मिझोरममध्ये सत्तेत येण्यास जवळपास सज्ज झाला आहे.
6 / 6
गेल्या विधानसभा निवडणुकीत लालदुहोमा ZPMच्या नेतृत्वाखालील आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उदयास आले. मिझोरामसाठी त्यांची लवचिकता आणि समर्पण दुर्लक्षित केले गेले नाही, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
टॅग्स :mizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३ElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री