Amritpal Singh Wife: अमृतपाल सिंगची NRI पत्नी किरणदीप कौर कोण आहे? १३ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:43 PM2023-02-23T18:43:39+5:302023-02-23T18:52:11+5:30

पंजाबच्या अमृतसर वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.

पंजाबच्या अमृतसर वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. आपला जवळचा मित्र लवप्रीत तुफानच्या अटकेचा निषेध करत असलेले अमृतपाल सिंह अनेक समर्थकांसह अजनाला येथे पोहोचले.

यावेळी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. खलिस्तानी विचारसरणीचे समर्थक अमृतपाल सिंग वारिस हे पंजाब दे संघटनेचे प्रमुख आहेत. रस्ता अपघातात मरण पावलेल्या अभिनेता-कार्यकर्त्या दीप सिद्धूने ही संघटना स्थापन केली होती.

या महिन्यात अमृतपाल सिंगचे लग्न झाले. 10 फेब्रुवारी रोजी एका साध्या सोहळ्यात त्यांनी एनआरआय किरणदीप कौरसोबत लग्नगाठ बांधली. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंग यांचा विवाह जल्लूपूर खेडा गावात असलेल्या गुरुद्वारा साहिब येथे झाला.

लग्नाचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या किरणदीप कौर या अनिवासी भारतीयाशी त्याचे लग्न झाल्याचे कळले.

हे दोन्ही कुटुंब जुन्या ओळखीचे असल्याचे सांगण्यात आले. किरणदीपची कौटुंबिक पार्श्वभूमी जालंधरची आहे. मूळचे जालंधरमधील कुलरण गावचे असून ते काही काळापूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते.

अमृतपाल सिंग यांनी त्यांच्या लग्नाला रिव्हर्स मायग्रेशन म्हटले आहे. लग्नानंतर पत्नी पंजाबमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वारिस पंजाब देची स्थापना दिवंगत गायक आणि अभिनेता दीप सिद्धू यांनी केली होती. काही महिन्यांपूर्वी दुबईहून परतलेल्या अमृतपाल सिंगने 2022 मध्ये अपघातात मृत्यू झाल्यानंतर दीप सिद्धूची 'वारीस पंजाब दे' ही संस्था ताब्यात घेतली.

टॅग्स :पंजाबPunjab