कोण आहे हा 13 वर्षांचा अवलिया, ज्यानं कमावले 6.9 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:50 IST2019-03-18T15:41:16+5:302019-03-18T15:50:30+5:30

संगीत ऐकण्याची आवड बऱ्याच जणांना असते, पण ते शिकणे सोपं नसते. त्यासाठी मोठी साधना करावी लागते.
चेन्नईच्या एका 13 वर्षीच्या अवलियानं या साधनेच्या जोरावर जगभरात नाव कमावलं आहे.
पियानोवादक लिडियन नादस्वरम याने संगीत साधनेतून 6.9 कोटी रुपये कमावले आहेत.
लिडियनने अमेरिकन रिअॅलिटी शो 'द वर्ल्ड्स बेस्ट' चा किताब आपल्या नावावर केला.
त्याला यासाठी बक्षीस स्वरूपात 1 मिलियन डॉलर म्हणजे 6.9 कोटी रुपये मिळाले आहेत.
लिडियन चेन्नईच्या केएम म्युझिक KM Music Conservatoryचा विद्यार्थी आहे. या संस्थेची स्थापना प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनी केली आहे.
लिडियन नादस्वरमला चंद्रावर जायचं आहे आणि बीथोवेन मूनलाइट सोनाटा खेळायचं आहे, अशी इच्छा त्यानं बोलून दाखवली आहे.
तसेच त्याला भावनिक सिनेमांसाठी संगीत द्यायचं आहे.