शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 00:08 IST

1 / 7
युट्यूबर ज्योती मल्होत्रा हे नाव देशभरात चर्चेत आहे. पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआयसाठी तिने भारतात हेरगिरी केली. तिथल्या अधिकाऱ्यांना देशाच्या सुरक्षेबद्दलची गोपनीय माहिती पुरवल्याचा तिच्यावर आरोप आहे.
2 / 7
अटक केल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिचा मोबाईल तपासण्यात आला. ज्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी दूतावासात गेलेल्यानंतर ज्योती दानिशच्या संपर्कात आली आणि तिथूनच या प्रकरणाला सुरूवात झाली.
3 / 7
भारतातील पाकिस्तानच्या दूतावासात तेव्हा असलेल्या अहसान उर रहीम उर्फ दानिशशी तिची ओळख झाली. तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला. नंतर त्यांचं बोलणं वाढलं. त्यानंतर तिला २०२३ मध्ये पाकिस्तानचा १० दिवसांचा व्हिसा मिळाला.
4 / 7
याच दानिशने तिला पाकिस्तानात गेल्यावर अली अहवानला भेटायला सांगितले. अली अहवानने मग तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.
5 / 7
याच दौऱ्यात ज्योती मल्होत्राची अली अहवानने पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या अधिकाऱ्याशी ओळख करून दिली. ज्या आयएसआयच्या अधिकाऱ्यांना ती भेटली, त्यांची नावे आहेत शकीर आणि राणा शाहबाज!
6 / 7
शकीर आणि राणा शाहबाज हे दोघेही आयएसआयचे अधिकारी असल्याचे निष्पन्नही झाले आहे. त्याचवेळी ज्योती मल्होत्राने शाकीरचा मोबाईल नंबर घेतला आणि तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला.
7 / 7
शाकीरचा मोबाईल नंबर सेव्ह करताना तिने एक खबरदारी घेतली. ती म्हणजे शाकीर या नावाने तो सेव्ह न करता जाट रंधावा या नावाने सेव्ह केला. त्यानंतर ती भारतात परत आली. ज्योती मल्होत्राने भारतात आल्यानंतर त्यांना व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना माहिती पाठवली.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानISIआयएसआयCrime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तान