कर्नाटकातील धबधबे ठरत आहेत पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 01:37 PM2019-07-25T13:37:44+5:302019-07-25T14:25:43+5:30

कर्नाटकातलं हुबळी शहर हे वेगानं विकसित होत आहे. व्यवसायाबरोबरच इथे पर्यटनामध्येही वृद्धी आली आहे. हुबळीला चहूबाजूंनी निसर्गाचं वरदान लाभलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. इथली नैसर्गिक दृश्यं, धबधबे, मंदिर आणि ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात. हुबळी शहराला लागूनच निसर्गरम्य धबधबे आहेत. यातील काही धबधबे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

सथोडी धबधबा - हुबळीच्या 75 किलोमीटर अंतरावर सथोडी धबधबा आहे. कर्नाटकातला हा सर्वात सुंदर आणि विशाल धबधबा आहे. इथे वातावरण शांत आणि मनमोहक असतं. या धबधबा 50 फूट उंचावरून कोसळतो.

मगोड धबधबा- सथोडी धबधब्यासह आपण हुबळीतल्या मगोड धबधब्यावर जाण्याचाही प्लान आखू शकता. हुबळीच्या मुख्य शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर हा धबधबा स्थित आहे.

हा धबधबा 650 फूट उंचावरू कोसळतो. इथले सूर्यास्ताचं दर्शनही आल्हाददायक असतं.

जोग धबधबा - हुबळीपासून 190 किलोमीटर अंतरावर जोग धबधबा आहे. कर्नाटकातल्या विशाल धबधब्यांपैकी हा एक आहे.

हा धबधबा 900 फूट उंचावरून कोसळतो. त्यामुळे तो पर्यटकांना आकर्षित करतो. हा धबधबा शारावथी नदीला जाऊन मिळतो.

सोगल्ला धबधबा- सोगल्ला धबधबा हुबळीपासून 75 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे गेल्यावर ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. कर्नाटकातल्या लोकांमध्येही हा धबधबा लोकप्रिय आहे.

या धबधब्याजवळ एक मंदिर आहे. हे सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची वास्तुकला पर्यटकांना प्रभावित करते.