शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी गेमचेंजर ठरणार 'हा' नवा कॉरिडोर; रशियाला ४० दिवसांऐवजी आता २४ दिवसांत सामान पोहचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:13 IST

1 / 10
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या २ दिवसीय भारत दौऱ्यात अनेक करार झाले. त्यात दोन्ही देशांमध्ये चेन्नई ते व्लादिवोस्तोक ईस्टर्न कॉरिडोरवरही चर्चा झाली. हा कॉरिडोर फक्त १०,३७० किमी लांबीचा असेल. ज्यामुळे भारतीय जहाज सरासरी २४ दिवसांत रशियाला पोहचेल.
2 / 10
सध्या भारताला रशियाच्या सेंट पीटर्सबर्गपर्यंत सामान पाठवण्यासाठी जहाजांना १६ हजार किमी दीर्घ प्रवास करावा लागतो. ज्यासाठी जवळपास ४० दिवस लागतात. आता नव्याने बनणाऱ्या कॉरिडोरने ५७०० किमी अंतर कमी होईल आणि त्यामुळे भारतासाठी १६ दिवसांची बचत होणार आहे.
3 / 10
५ डिसेंबर रोजी पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान हा सागरी मार्ग लवकरच खुला करण्याबाबत एक करार झाला. जागतिक तणावाच्या काळात हा नवीन मार्ग एक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पर्याय प्रदान करू शकेल असे मानले जाते.
4 / 10
मोदी आणि पुतिन यांच्यातील बैठकीत २०३० पर्यंत भारत-रशिया व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. सध्या दोन्ही देश अंदाजे ६० अब्ज डॉलर्सचा व्यापार करतात.
5 / 10
या कॉरिडोरच्या माध्यमातून चेन्नईच्या मलक्का खाडी, दक्षिण चीन समुद्र आणि जपान समुद्रातून व्लादिवोस्तोकपर्यंत जाण्यासाठी १६ दिवस प्रवास वाचेल. हा मार्ग सुरक्षेसोबतच येणाऱ्या काळात भारत रशिया व्यापारासाठी गेमचेंजर सिद्ध होऊ शकतो.
6 / 10
हा कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. एकदा सुरू झाल्यानंतर तो तेल, वायू, कोळसा, यंत्रसामग्री आणि धातू यासारख्या आवश्यक क्षेत्रातील व्यापाराला चालना देईल, ज्यामुळे भारताची पुरवठा साखळी लक्षणीयरित्या मजबूत होईल. या मार्गामुळे भारत-रशिया आर्थिक भागीदारी नवीन उंचीवर जाईल असं तज्ज्ञांनी म्हटलं.
7 / 10
गाझा युद्धामुळे सुएझ कालव्याच्या मार्गाला धोका वाढला आहे आणि युक्रेनियन संघर्षामुळे युरोपमार्गे रशियाला जाणाऱ्या पारंपारिक सागरी मार्गाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हा नवा मार्ग भारत-रशियासाठी फायदेशीर ठरणार आहे.
8 / 10
चेन्नई-व्लादिवोस्तोक पूर्व कॉरिडॉरे कार्यान्वित झाल्यानंतर भारत रशियाकडून कच्चे तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, खते, धातू आणि इतर औद्योगिक वस्तू आयात करू शकेल. यामुळे भारताच्या ऊर्जा आणि कच्च्या मालाच्या गरजा पूर्ण होतील. भारत रशियाला यंत्रसामग्री, अभियांत्रिकी वस्तू, ऑटो पार्ट्स, कापड, कृषी आणि सागरी उत्पादने निर्यात करू शकतो.
9 / 10
मुंबई ते सेंट पीटर्सबर्ग हा सुएझ कालव्याद्वारे जाणारा पारंपारिक मार्ग १६,०६० किमी लांबीचा आहे. युद्धामुळे हा मार्ग आज सर्वात धोकादायक, लांब आणि महागडा मानला जातो.
10 / 10
याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण व्यापार कॉरिडॉर ७,२०० किमी लांबीचा आहे. तो मुंबई ते इराण आणि अझरबैजान मार्गे रशियातील व्होल्गोग्राडपर्यंत जातो. ७,२०० किमी लांबीचा हा मल्टी-मॉडल कॉरिडॉर मालवाहतुकीचा वेळ २५-३० दिवसांनी कमी करतो. तो पारंपारिक मार्गापेक्षा स्वस्त आहे परंतु इराणमुळे येथे तणाव कायम आहे.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी